गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या कै. ज. वा. तथा बाबुराव जोशी ग्रंथालयात दीपावलीचे औचित्य साधून ‘दिवाळी अंक-२०२३चे’ प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. उपस्थितांचे स्वागत गुलाबपुष्प देऊन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना ग्रंथपाल श्री. किरण धांडोरे यांनी यावर्षीच्या दिवाळी अंकांचे वैशिष्ट्ये सांगितली. विविध विषयांना वाहिलेल्या अंकांचा त्यांनी आढावा घेतला. महाविद्यालयीन ग्रंथालयाने आपली परंपरा जपत या साहित्यरूपी फराळाचे आयोजन केले असल्याचे त्यांनी नमूद केले.
प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना या उपक्रमाचे कौतुक केले आणि सहभागींचे अभिनंदन केले. दर्जेदार दिवाळी अंक ही वाचकांना एक पर्वणी असते. त्यामुळे वर्षभरातील घडामोडी, कला, क्रीडा, सांस्कृतिक, वैचारिक, साहित्यिक अशा विविध गोष्टींचा आढावा दिवाळी अंकांत समाविष्ट असतो. प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांच्या आवडी-निवडी जपणारा हा साहित्यरूपी ठेवा सर्वांनाच उपयुक्त आहे; असे मत त्यांनी मांडले.
या कार्यक्रमाला कला शाखेच्या उपप्राचार्या डॉ. चित्रा गोस्वामी, विज्ञान शाखेच्या उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी, भूगोल विभागाचे प्रमुख डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई, ग्रंथपाल श्री. किरण धांडोरे, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. सुनील गोसावी, पर्यवेक्षक प्रा. विद्याधर केळकर, प्रा. अरुण यादव, प्रा. अनुजा घारपुरे आणि विद्यार्थी उपस्थित होते. आभारप्रदर्शन श्री. उत्पल वाकडे यांनी केले.
![]() |
![]() |