गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे भूतपूर्व प्राचार्य डॉ. वि. के. बावडेकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ विज्ञान व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार दि. ८ फेब्रुवारी २०२० रोजी दुपारी १२.३० वाजता या महाविद्यालयाच्या राधाबाई शेट्ये सभागृहात व्याख्यानमालेचे ३४वे पुष्प रासायनिक तंत्रज्ञान संस्था, मुंबईचे अधिष्ठाता डॉ. सुनील भागवत गुंफणार आहेत. ‘शाश्वत उर्जा’ असा त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे.
डॉ. भागवत रासायनिक तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथे केमिकल इंजिनीरिंग विभागात प्रोफेसर असून तेथे ज्येष्ठ शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी ‘शाश्वत उर्जा’ या क्षेत्रात अनेक संशोधन प्रकल्पांवर काम केले आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन भूषविणार आहेत.
रत्नागिरीतील नागरिकांनी या व्याख्यानाला आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी केले आहे.