विद्यमान वर्षी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ येथे राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन शिबीर आव्हान, आयोजित केले गेले होते. रत्नागिरी जिल्ह्याचे समूहाचे संघ व्यवस्थापक प्रतिनिधी कार्यक्रमाधिकारी म्हणून डॉ. दानिश गनी यांनी या शिबिरात सहभाग घेतला. कुलगुरू प्रो. विजय माहेश्वरी यांचे हस्ते विशेष कार्य करणाऱ्या निवडक संघ व्यवस्थापकांचा सत्कार करण्यात आला. डॉ. दानिश गनी यांचे मार्गदर्शनाखाली रत्नागिरी जिल्ह्यातील २५ विद्यार्थी स्वयंसेवकांनी या शिबिरात सहभाग घेतला होता.
आपत्ती व्यवस्थापन, समुह प्रशिक्षण, सांस्कृतिक स्पर्धा, शोभायात्रा यासाठी डॉ. गनी यांनी स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले. या सत्कार प्रसंगी प्रो. एस. टी. इंगळे, राज भवन निरीक्षण समिती अध्यक्ष व राष्ट्रीय सेवा योजना संचालक मा. सचिन नांद्रे, डॉ. नम्रता श्रेयांश, डॉ.पाभ्रेकरआदी मान्यवर उपस्थित होते.







Visitors Online : 0