gogate-college-autonomous-updated-logo

मुंबई विद्यापीठाच्या ‘गणित अभ्यासमंडळावर’ गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे डॉ. राजीव सप्रे

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या गणित विभागाचे प्रमुख डॉ. राजीव सप्रे यांची मुंबई विद्यापीठाच्या गणित अभ्यास मंडळावर नुकतीच निवड झाली आहे. महाविद्यालयाच्या गणित विभागात ३४ वर्षे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. तर शास्त्र शाखेच्या उपप्राचार्य पदाचा त्यांनी दोन वेळा कार्यभार सांभाळला आहे. रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे ते आजीव सभासद असून बारटक्के इन्स्टिट्यूट ऑफ इन्फर्मेशन टेक्नोलॉजी विभागाचे समन्वयक म्हणून ते काम पाहतात. तसेच ते महाविद्यालयाच्या IQAC चेही ते समन्वयक आहेत.

त्यांनी वीस शोधनिबंध प्रकाशित केले असून त्यांनी बारा पुरस्कारप्राप्त शोध प्रकल्पांना मार्गदर्शन केले आहे. गणित विषयाची विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण होण्याच्या हेतूने ते विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन ते करत असतात. गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या गणित विभागाद्वारे प्रतिवर्षी राज्यस्तरीय संशोधन प्रकल्प स्पर्धा- उपयोजित गणित अशी घेतली जाते. या त्यांच्या कार्याचा आढावा घेत मुंबई विद्यापीठाच्या गणित अभ्यास मंडळावर थेट कुलगुरूंकडून त्यांचे नामनिर्देशन करण्यात आले आहे.

मुंबई विद्यापीठाच्या अभ्यास मंडळावर नियुक्ती झाल्याबद्दल डॉ. राजीव सप्रे यांचे रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्ष श्रीम. शिल्पाताई पटवर्धन, कार्यवाह श्री. सतीश शेवडे, गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, शास्त्र शाखेचे उपप्राचार्य विवेक भिडे यांनी हार्दिक अभिनंदन केले आहे.

मुंबई विद्यापीठाच्या ‘गणित अभ्यासमंडळावर’ गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे डॉ. राजीव सप्रे
Comments are closed.