रत्नागिरी येथील गोगटे जोगळेकर महाविद्यालयात प्रतिवर्षी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य, रसायनशास्त्र विभागाचे माजी विभागप्रमुख, विद्यार्थीप्रिय शिक्षक आणि उत्तम प्रशासक कै. वि. के. बावडेकर यांच्या स्मृतीनिमित्त विज्ञान व्याख्यानमाला आयोजित केली जाते. यावर्षी दि. ३१ जानेवारी २०२३ रोजी दु. ३.०० वाजता नगराध्यक्ष रंगमंच, राधावाई शेट्ये सभागृह गोगटे जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी येथे संपन्न होणार आहे.
व्याख्यानमालेचे हे २७वे वर्ष असून डॉ. व्ही. व्ही. महाजनी, प्रोफेसर ऑफ केमिकल इंजिनिअरिंग आय.सी.टी.(यु.डी.सी.टी.) मुंबई यांचे ‘हरित रसायनशास्त्र- माझे आकलन’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. हरित रसायनशास्त्राकडे ‘शाश्वत रसायनशास्त्र म्हणून राहिले जाते पुनर्वापर, पुनरुत्पादन आणि कमी वापर हे त्रिसूत्र हरितरसायनशास्त्र मोठ्या प्रमाणात वापरले जाते. या क्षेत्रातील संशोधनामध्ये काळानुरूप भर पडत आहे. त्यातूनच पर्यावरणपूरक विकासाचा नवा आयामही साधता येत आहे. यातील संशोधनाचे अनेक पैलू डॉ. महाजनी व्याख्यानादरम्यान उलगडून सांगतील.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान र. ए. सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन भूषविणार आहेत. या कार्यक्रमास शहरातील विज्ञानप्रेमी नागरिकांनी आवर्जुन उपस्थित राहण्याचे आवाहन प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी केले आहे.