gogate-college-autonomous-updated-logo

कै. बाबुराव जोशी ग्रंथालयात ‘ई-रिसोअर्स शेअरिंग’ विषयक पदव्युत्तर विद्यार्थी कार्यशाळा संपन्न

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात आंतराष्ट्रीय आवर्त सारणीवर्षानिमित्त व्याख्यान संपन्न

महाविद्यालयाच्या विज्ञान आणि वाणिज्य विभागातील पदव्युत्तर विद्यार्थ्यांकरिता ‘ई-रिसोअर्स शेअरिंग’ याविषयी मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. पदव्युत्तर विद्यार्थ्यांना इंटरनेट माहिती जालावरील ई-बुक्स, ई-जर्नल्स, डाटाबेस तसेच सीडी रॉम, टॉकिंग बुक्स इ. उपलब्ध वाचन साहित्याचा आपल्या अभ्यास आणि संशोधन कामाकरिता कशाप्रकारे प्रकारे उपयोग करून घेता येईल याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. तसेच ग्रंथालयाकडे असलेले ‘एनलिस्ट’ आणि ‘डेलनेट’ हे प्रमुख डेटाबेस विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत. या डेटाबेसवरील प्रबंध, पुस्तके आणि नियतकालिके यांचा व त्यातील माहितीचा कशाप्रकारे शोध घ्यावा तसेच ही माहिती डाऊनलोड करताना वापरावयाची तंत्रे इ. सर्व तांत्रिक बाबींचे उपस्थित विद्यार्थ्यांना प्रेझेंटेशन देण्यात आले. कार्यशाळेत सहभागी विद्यार्थ्यांनी आपल्या विविध शंका प्रदर्शित करून अधिक माहिती प्राप्त केली.

सदर कार्यशाळेस ग्रंथपाल श्री. किरण धांडोरे, सहाय्यक ग्रंथपाल श्री. उत्पल वाकडे, श्री. संतोष जाधव आणि श्री. उन्मेष नितोरे यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमप्रसंगी पदव्युत्तर विभागाचे समन्वयक डॉ. प्रफुल्ल कुलकर्णी, डॉ. मेघना म्हादये, विज्ञान विभागातील इतर प्राध्यापक आणि पदव्युत्तर विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. चहापानाने कार्यशाळेची सांगता झाली.

Comments are closed.