भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही शासनप्रणाली असणारा देश असून निवडणुका या लोकशाहीचा आधार मानला जातो. देशाचे सरकार निवडीचे महत्वाचे माध्यम म्हणून निवडणुकांकडे पाहिले जाते. निवडणुकांचे विश्लेषण करण्याचे शास्त्र म्हणजे निवडणूकशास्त्र होय. विद्यार्थ्यांना राज्यशास्त्र विषयाशी संबंधित उपयुक्त प्रशिक्षण मिळावे या हेतूने राज्यशास्त्र व गणित विभागाच्या संयुक्त विद्यमाने निवडणूक विश्लेषण शास्त्र कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
पारंपारिक अभ्यासक्रमासोबत विद्यार्थ्यांना कौशल्य विकसनावर आधारित व भविष्यातील व्यावसायिक उपयोगितेच्या अनुषंगाने शिक्षण मिळावे याकरिता गोगटे जोगळेकर महाविद्यालय सातत्याने विविध उपक्रम राबवीत असते. या पार्श्वभूमीवर प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाच्या गणित आणि राज्यशास्त्र विभागाच्यावतीने निवडणुकशास्त्र विश्लेषण प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणून सदर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
कार्यशाळेचे उद्घाटन कला शाखेच्या उपप्राचार्या डॉ. चित्रा गोस्वामी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. याप्रसंगी त्यांनी विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना विविध अभ्यासपुरक आणि व्यवसायपूरक कौशल्ये प्राप्त केली पाहिजेत. त्याचा भविष्यात खूप उपयोग होतो असे सांगितले.
या कार्यशाळेत प्रा. निलेश पाटील यांनी निवडणुक विश्लेषणशास्त्र म्हणजे काय, त्यातील व्यावसायिक संधी, सद्यकाळातील या विषयाचे महत्व, याकरिता अवश्यक कौशल्ये याविषयी मार्गदर्शन केले. गणित विभागप्रमुख डॉ. राजीव सप्रे यांनी या अभ्यासक्रमाची उद्दिष्टे, विशीष्टये आणि स्वरूप स्पस्ट करून विद्यार्थ्यांनी या कोर्समध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले.
कार्याशालेकारिता राज्यशास्त्र विभागातील प्रा. सिद्धिका पिलणकर आणि सामाजिकशास्त्र शाखेतील विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.