गोगटे जोगळेकर महाविद्यालयात शैक्षणिकवर्ष २०२४-२५ मध्ये कला शाखेतील पदव्युत्तर अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे.
र. ए. सोसायटीचे गोगटे जोगळेकर महाविद्यालय हे कोकणातील आणि मुंबई विद्यापीठातील एक प्रतिष्ठीत आणि नामवंत महाविद्यालय आहे. कोकणातील विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाच्या उच्च शिक्षणाची सोय उपलब्ध व्हावी म्हणून महाविद्यालयात कला, विज्ञान आणि वाणिज्य या पारंपरिक अभ्यासक्रमांतील पदवी- पदव्युत्तर अभ्यासक्रमांबरोबरच विविध व्यावसायिक अभ्यासक्रम चालविले जातात.
महाविद्यालयाच्या लोकमान्य टिळक पदव्युत्तर केंद्राच्या माध्यमातून एम.ए., एम. कॉम, एम.एस्सी.हे पदव्युत्तर अभ्यासक्रम चालविले जातात. इतर ज्ञान शाखांमधील अथवा इतर विषयांमधील पदवीप्राप्त विद्यार्थ्यांना कला शाखेतील पदव्युत्तर अभ्यासक्रमास प्रवेश घ्यायचा असेल तर मुंबई विद्यापीठाच्या मार्गदर्शनपर सूचनेनुसार प्रवेशपरीक्षा द्यावी लागते. परीक्षेतपात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमास प्रवेश दिला जातो. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये मराठी, हिंदी, संस्कृत, इंग्रजी या भाषा आणि इतिहास, अर्थशास्त्र आणि समाजशास्त्र या सामाजिक शास्त्रांच्या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी शुक्रवार दि. २८ जून, २०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता प्रवेश परीक्षेचे आयोजन महाविद्यालयातील सबंधित विभागात करण्यात आले आहे. सदर विषयांच्या पदव्युत्तर वर्गात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी परीक्षेचा अभ्यासक्रम आणि अन्य माहितीसाठी संबंधित विभागप्रमुखांशी संपर्क साधावा.
गतवर्षी मिळालेला स्वायत्ततेचा दर्जा आणि नवीन शैक्षणिक धोरणाला अनुसरून सुरु करण्यात येणाऱ्या नवनवीन विषय, अभ्यासक्रमांचा लाभ कोकणातील अधिकाधिक विद्यार्थ्यानी घ्यावा, असे आवाहन गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनीकेले आहे.