gogate-college-autonomous-updated-logo

राज्यस्तरीय विज्ञान ‘निबंध स्पर्धा’

विज्ञानलेखनाला प्रोत्साहन तसेच विज्ञान व्यक्त करण्यासाठी मराठी भाषा समृद्धकरण्याच्या उद्देशाने मराठी विज्ञान परिषदेतर्फे घेतल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय विज्ञान निबंध स्पर्धेसाठी, विद्यार्थी गटाकरिता (इयत्ता १२वी पर्यंत) ‘इ-कचरा’ आणि खुल्या गटाकरिता ‘प्रकाश प्रदषूण’ हे विषय आहेत. स्पर्धेसाठी निबंध पाठवण्याची अंतिम तारीख ३१ ऑगस्ट आहे. निबंधाची शब्दमर्यादा १५०० ते २००० असून मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांतील स्पर्धकांनी आपले निबंध, डॉ. उमेश संकपाळ, मराठी विज्ञान परिषद – रत्नागिरी विभाग, द्वारा रसायनशास्त्र विभाग, गोगटे जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी- ४१५६१२ या पत्त्यावर पाठवावेत.

स्पर्धा विनाशुल्क असून विभागीय स्तरावरील विजेत्यांना पारितोषिके दिली जातात. तरी सर्वाधिक संख्येने विद्यार्थी व नागरिकानी आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी केले आहे.अधिक माहितीकरिता http://mavipa.org या संकेतस्थळाला भेट द्यावी.

Comments are closed.