gogate-college-autonomous-updated-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात अर्थशास्त्र विभागामार्फत ‘वित्तीय साक्षरता’ कार्यशाळा संपन्न

गोगटे जोगळेकर महाविद्यालयातअर्थशास्त्रविभागामार्फत ‘वित्तीय साक्षरता’ कार्यशाळा संपन्न

गोगटे जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त) रत्नागिरी, अर्थशास्त्र विभाग व करियर कट्टा, नाबार्ड आणि विभागीय सहसंचालक, उच्च शिक्षण, कोकण  विभाग, पनवेल, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘वित्तीय साक्षरता’या एक दिवसीय कार्शाला संपन्न झाली. या कार्यशाळेत अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी असे प्रतिपादन की, पैशाचे व्यवस्थापन करण्याचे कौशल्य विद्यार्थीदशेत आत्मसात करणे खुप महत्वाचे आहे. योग्य वेळी केलेली पैशाची बचत, योग्य ठिकाणी केलेली पैशाची गुंतवणूक आपणास आयुष्यभर सुख आणि आर्थिक समृद्धी देत असते. ‘पैसा जपला तरच पैसा आपल्याला जपतो’ या उक्ती प्रमाणे विद्यार्थी दशेत पैशाचे व्यवस्थापन करणे आवश्यक आहे.  जग बदलतेय तसा आपला भारत देशही बदलत आहे. सध्या जगातल्या पाच मोठ्या  अर्थव्यवस्थेत आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेचा समावेश होतो. पुढील २५ वर्षात म्हणजे २०४७ मध्ये देश स्वातंत्र्याची १०० वर्ष साजरी करेल तेव्हा विकसित देशांच्या यादीत आपल्या भारत देशाचा समावेश करण्याचे महत्वाकांक्षी ध्येय आपल्या देशाचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी ठेवले आहे. आपल्या देशाचे भविष्य सक्षम कारावयाचे असेल तर आपली तरुणाई आर्थिकदृष्ट्या साक्षर असणे आवश्यक आहे आणि हे अर्थविषयक जाणीव जागृतीचे महत्त्वपूर्ण काम आपल्या वित्तीय साक्षरतेच्या कार्यशाळेतून होईल.

‘अर्थ निर्मिती’ या विषयावर मार्गदर्शन करताना नाबार्ड नियुक्त मार्गदर्शक श्री. प्रशांत औटी यांनी वित्तीय साक्षरता संदर्भात मार्गदर्शन केले. आपल्या मार्गदशनात त्यांनी शिक्षणाचा हेतू काय असावा? आपणास आर्थिक स्वातंत्र्यकामिळाले पाहिजेत? याची जाणीव विद्यार्थांना करून दिली. आपण पैशामध्ये किंमत करतो पण पैशाची किंमत कशी करावयाची? हे आपल्याला कुणीही कधीच सांगत नाही आणि पैसे कमवायला किती धडपड करावी लागतेहे पैसा कमवायला लागल्याशिवाय आपणास उमजत नाही. विविध शासकीय योजनांच्या माध्यमाचे गुंतवणुकीचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. बँकांतील ठेवीमधील गुंतवणूक, विमा, शेअरबाजार, SIP, मुच्युअल फंडयासारख्या पर्यायांमध्ये गुंतवणूक करून आपणास आर्थिक सुबकता प्राप्त करता येईल, पैसे गुंतवणूक करताना आपली आणि आपल्या कुटुंबाची फसवणूक होऊ नये याची जाणीव विद्यार्थांना व्हावी, वित्तीय बाजार, प्रभावी पैशाचे आणि वैयक्तिक वित्तीय गुंतवणुकीचे नियोजनकसे करावे? या संदर्भात विद्यार्थांना मार्गदर्शन केले.

या कार्यशाळेत अर्थशास्त्र विभागातील ५३ विद्यार्थ्यांनीसहभाग घेतला. कार्यशाळेते विद्यार्थांना वित्तीय गुंतवणुकीच्या विविध पर्यायी संधीची माहिती पॅनकार्ड, डीमॅट खाते काढण्याची मोफत सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती त्याचा लाभ विद्यार्थांना मिळाला.

कार्यशाळेच्या नियोजनासाठी डॉ. संजय जगताप, विभागीय सहसंचालक, उच्च शिक्षण, कोकण  विभाग, पनवेल, महाराष्ट्र शासन, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. प्रफुल्लदत्त कुलकर्णी, कला शाखा उपप्राचार्य डॉ. चित्रा गोस्वामी यांचे सहकार्य लाभले.

सदर कार्यशाळेचे प्रास्ताविक करतानाअर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. रामा सरतापे यांनी कार्यशाळेच्या आयोजनाचा हेतू सांगून अर्थशास्त्र विभागामार्फत घेण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिले. सूत्रसंचालन डॉ. दिनेश माश्रणकर यांनी तर  प्रा. सुर्यकांत माने यांनी आभार व्यक्त केले.

 

 

 

Comments are closed.