gogate-college-autonomous-updated-logo

कोकण विभागात प्रथम क्रमांक गोगटे जोगळेकर (स्वायत्त) महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा

रत्नागिरी येथील गोगटे जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त) या सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या व विविध समाजोपयोगी उपक्रमांत सातत्याने सक्रिय सहभाग नोंदविणाऱ्या महाविद्यालयाने पुन्हा एकदा उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

महाविद्यालय ग्रामीण व किनारी भागाशी घट्ट नाळ जुळवून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाबरोबरच पर्यावरण संरक्षण, शाश्वत विकास उपक्रमांमध्ये अग्रेसर राहिले आहे. विविध विभागांच्या माध्यमातून महाविद्यालय नियमितपणे समाजाभिमुख कार्यक्रम राबवत असते. त्यामुळे परिसरात महाविद्यालयाची “समाजाशी जोडलेले शिक्षण” अशी ओळख निर्माण झाली आहे.

याच कार्यपरंपरेत महाविद्यालयाने ‘रिअर्थ क्लायमेट स्किल’ सादरीकरण कार्यक्रमामध्ये कोकण विभागात प्रथम क्रमांक मिळवून मानाचा तुरा रोवला. हा कार्यक्रम ब्रिटिश कौन्सिल आणि मुंबई विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने नॅशनल सेंटर फॉर नॅनोसायन्स आणि नॅनोटेक्नॉलॉजी, सांताक्रुज, मुंबई येथे आयोजित करण्यात आला होता. या यशाबद्दल महाविद्यालयाला “समुद्री शैवाल संकलन आणि जैवखत निर्मितीसाठी त्याचा उपयोग” या सामाजिक कृती आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी रु. ८०,०००चे अनुदान मिळणार आहे.

सदर कृती आराखडा महाविद्यालयातील कु. सुजल सावंत, कु. निधी नागवेकर, कु. साक्षी बेर्डे, गौरांग नामजोशी या विद्यार्थ्यांनी क्लायमेट स्किलच्या समन्वयकांच्या मार्गदर्शनाखाली तयार केला. वनस्पतिशास्त्र विभागातील प्रा. शरद आपटे आणि प्रा. परेश गुरव यांनी प्रकल्पाला मार्गदर्शन केले तर अंतिम सादरीकरण प्रा. परेश गुरव यांनी केले. कार्यक्रमात माननीय मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी यांच्या हस्ते संघाचा सत्कार करण्यात आला.

गोगटे जोगळेकर (स्व्यात्त) महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, विज्ञान शाखा उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी तसेच वनस्पतिशास्त्र विभागप्रमुख डॉ. सोनाली कदम यांनी या यशाबद्दल विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शकांचे अभिनंदन करून भविष्यातही पर्यावरणपूरक व समाजहिताचे उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्याचा संकल्प व्यक्त केला.

Comments are closed.