शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी प्रथम वर्ष बी.ए./बी.कॉम./बी.एस्सी.; बी.कॉम. (अकौटिंग फायनान्स); बी.एम.एस./बी.एस्सी. (कॉम्प्यूटर); बी.एस्सी. (आय.टी.); बी.एस्सी. (बायोटेक्नॉलॉजी); बी.एस्सी. (बायोकेमिस्ट्री); बी.एस्सी. (मायाक्रोबायोलॉजि) या वर्गातील प्रवेशांकारिता प्रवेश अर्ज दि. २७ मे ते दि. १२ जून २०२३ या कालावधीत ऑनलाईन उपलब्ध होतील.
दि. २७ मे ते दि. १२ जून २०२३ पर्यंत विद्यार्थ्यांना mum.digitalunivarsity.ac व resgjcrtn.com या वेबसाईटवर आपल्या प्रवेशाची तात्पुरती नोंदणी करून त्याची प्रिंटआउट घ्यावी.
प्रथम वर्ष बी.ए./बी. कॉम./बी.एस्सी. या वर्गांचे प्रवेश कायम करण्याची प्रक्रिया दि. ६ जून २०२३ ते दि. १२ जून २०२३ या कालावधीत सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत होईल. विद्यार्थ्यांनी ऑनलाइन भरलेले प्रवेश अर्ज व ऑनलाईन नोंदणी केलेल्या प्रवेश अर्जांची छापील प्रत, १२चे मूळ गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला व प्रत्येकी दोन झेरॉक्स प्रती, ३ रंगीत फोटो जमा करावयचे आहेत. त्याचवेळी प्रवेश फी भरायची आहे.
बी.कॉम. (अकौटिंग फायनान्स); बी.एम.एस./बी.एस्सी. (कॉम्प्यूटर); बी.एस्सी. (आय.टी.); बी.एस्सी. (बायोटेक्नॉलॉजी); बी.एस्सी. (बायोकेमिस्ट्री); बी.एस्सी. (मायाक्रोबायोलॉजि) विद्यार्थ्यांची पहिली गुणवत्ता यादी दि. १९ जून २०२३ रोजी दुपारी ११ वाजता लागेल व त्यांचे प्रवेश निश्चित करण्याचे काम दि. २० जून ते दि. २७ जून २०२३ रोजी होईल.
त्यानंतर शिल्लक जागा असल्यास दुसरी गुणवत्ता यादी दि. २८ जून २०२३ रोजी सायंकाळी ७ वाजता लागेल व या यादीतील प्रवेश निश्चित करण्याचे काम दि. ३० जून ते दि. ०५ जुलै २०२३ रोजी होईल.
त्यानंतर शिल्लक जागा असल्यास तिसरी व अंतिम गुणवत्ता यादी दि. ६ जुलै २०२३ रोजी सकाळी ११ वाजता लागेल व या यादीतील प्रवेश निश्चित करण्याचे काम दि. ७ जुलै २०२३ रोजी ते दि. १० जुलै २०२३ रोजी होईल.
प्रवेशासंदर्भात अधिक माहितीसाठी तसेच गुणवत्ता यादी पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या resgjctn.com या वेबसाईटला जरूर भेट ध्यावी असे गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी कळविले आहे.