विद्यार्थांच्या सर्वांगीण विकासात महत्वाचे योगदान देणाऱ्या आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागाची प्रथम सत्र कार्यशाळा दि. ०४ ऑगस्ट २०२२ रोजी गोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरी आणि मुंबई विद्यापीठ मुंबई आजीवन विभागाचे संयुक्त विद्यमाने संपन्न झाली. या कार्यशाळेस डॉ. कुणाल जाधव संचालक, आजीवन अध्ययन आणि विस्तार विभाग तसेच डॉ. पी. पी. कुलकर्णी प्राचार्य गोगटे जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी. प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. मकरंद साखळकर तसेच डॉ. विश्वंभर जाधव उपस्थित होते.
उद्घाटनप्रसंगी मनोगत व्यक्त करताना कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी आजीवन अध्ययन व विस्तार विभागाच्या कार्याचा आढावा घेऊन ग्रामीण भागात जाऊन तेथील जनतेचा कल्याणाच्या दृष्टीने प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी काम करावे असे मनोगत व्यक्त केले व उपस्थित प्राध्यापक व विद्यार्थी स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले.
या कार्यशाळेत डॉ. विश्वंभर जाधव यांनी ताणताणाव व्यवस्थापनाविषयी प्रोत्साहनपर मार्गदर्शन केले. प्रथम सत्र प्रशिक्षण कार्यशाळेमध्ये विस्तार विभागाच्या ध्येय उद्दिष्टांची चर्चा केली गेली आणि वर्षभर घेतल्या जाणाऱ्या उपक्रमांची माहिती आणि मार्गदर्शन डॉ. कुणाल जाधव यांनी केले.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक महाविद्यालयाच्या आजीवनअध्ययनआणिविस्तारविभागाचे समन्वयक डॉ. आर. ए. सरतापे यांनी केले. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा. सुर्यकांत माने यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विभागाचे प्रा. अंबादास रोडगे व सर्व प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.