gogate-college-autonomous-updated-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात अंतर्गत तक्रार निवारण समितीच्यावतीने जनजागृती अभियानाचे आयोजन

gjc-antargat-tkrar-nivaran-samiti-programme-march-22

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात अंतर्गत तक्रार निवारण समितीच्यावतीने जनजागृती अभियानाचे महाविद्यालयात नुकतेच आयोजन करण्यात आले होते.

महिलांचा लैगिक छळ अधिनियम २०१३ नुसार प्रत्येक शासकीय आस्थापनेअंतर्गत तक्रार निवारण समिती स्थापन करणे आवश्यक आहे. गोगटे जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी येथे अंतर्गत तक्रार निवारण समितीची स्थापना यापूर्वीच करण्यात आली असून ही समिती बऱ्याच वर्षांपासून महविद्यालयात कार्यरत आहे. या जनजागृती उपक्रमांतर्गत अंतर्गत तक्रार निवारण समितीच्या अध्यक्षा डॉ. चित्रा गोस्वामी, सदस्य प्रा. बीना कळंबटे, डॉ. सोनाली कदम, डॉ. विवेक भिडे, सौ. जान्हवी विचारे यांनी विद्यार्थांना महिलांचा कामाच्या ठिकाणी होणारा लैगिंक छळ, त्याचे विविध प्रकार, समितीची कार्यपद्धती याविषयक वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी, विद्यार्थांना मार्गदर्शन केले. या उपक्रमातून लैंगिक छळाअंतर्गत येणाऱ्या बाबींवर समिती सदस्यांनी आपल्या विचारातून प्रकाश टाकला.

या जनजागृती अभियानामध्ये महाविद्यालयांतील विद्यार्थी, शिक्षक आणि कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात आपला सहभाग नोंदवला.

Comments are closed.