रत्नागिरी येथील गोगटे जोगळेकर महाविद्यालयातर्फे प्रतिवर्षी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य, रसायनशास्त्र विभागाचे माजी विभागप्रमुख, विद्यार्थीप्रिय शिक्षक आणि उत्तम प्रशासक कै. डॉ. वि. के. बावडेकर यांच्या स्मृतीनिमित्त ‘विज्ञान व्याख्यानमाला’ आयोजित केली जाते. यावर्षी दि. २४ मार्च २०२२ रोजी दुपारी १२.३० वाजता नगराध्यक्ष रंगमंच, राधाबाई शेट्ये सभागृह, गोगटे जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी येथे सदर कार्यक्रम संपन्न होणार आहे.
व्याख्यानमालेचे हे ३६वे वर्ष असून श्री. अ. पां. देशपांडे, कार्यवाह, मराठी विज्ञान परिषद, मुंबई यांचे ‘वैज्ञानिक गोवारीकर, नारळीकर, उदगिकर यांचे संशोधन कार्य’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान र. ए. सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन भूषविणार आहेत.
या कार्यक्रमाला शहरातील विज्ञानप्रेमी नागरिकांनी आवर्जुन उपस्थित राहण्याचे आवाहन महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी केले आहे.