gogate-college-autonomous-updated-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभागाची आंबा घाट व विशाळगड परिसर येथे क्षेत्रभेट संपन्न

र. ए. सोसायटीच्या गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभागातर्फे नुकतीच आंबा घाट व विशाळगड परिसर येथे क्षेत्रभेटीचे आयोजन करण्यात आले होते. वनस्पतीशास्त्र या विषयामध्ये विद्यार्थ्यांना विविध परिसर व तेथे सापडणारी वनस्पतींची विविधता या विषयाचा अभ्यास असल्यामुळे विभागातर्फे वेगवेगळ्या ठिकाणी क्षेत्रभेटीचे आयोजन केले जाते.

विविध ठिकाणचे तापमान, तेथील भौगोलिक परिस्थिती यानुसार तेथील परिसंस्थेत आढळणाऱ्या पावन्पती यामध्ये वैविध्य आढळून येते. तसेच काही वनस्पती या ठराविक ठिकाणापुरत्या मर्यादित असतात. या जैवविविधतेचा अभ्यास करणे व नवनवीन वनस्पती व त्यांचे त्या परीसंस्थेतील महत्व जाणून घेणे हा या क्षेत्रभेटीचा हेतू असतो.

यावर्षी वनस्पतीशास्त्र विभागाने द्वितीय व तृतीय वर्ष विज्ञान या वर्षात वनस्पतीशास्त्र शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आंबा घाट व विशाळगड परिसर येथे क्षेत्रभेटीचे आयोजन केले होते. विभागप्रमुख प्रा. शरद आपटे यांनी विद्यार्थ्यांना वनस्पती कशा ओळखाव्या यामागील बारकावे समजावून सागितले. तसेच विविध औषधी वनस्पती व त्यांचे उपयोग याबद्दल मार्गदर्शन केले. यामध्ये अंजन, नाणा, हरडा, बेहडा, निटम, कार्वी, धायटी, नेचे, तुंबा, वन्यलिंबू, आंबगुळ, दातपाडी इ. वनस्पती दाखवून त्यांचे उपयोग व आंबा घाट परिसरातील परिसंस्थेत असलेले महत्व अधोरेखित केले.

या क्षेत्रभेटीमध्ये विभागाने द्वितीय व तृतीय वर्ष विज्ञान या वर्षात वनस्पतीशास्त्र विभागातील विद्यार्थी, विभागप्रमुख प्रा. शरद आपटे आणि प्रा. ऋजुता गोडबोले हे सहभागी झाले होते.

Comments are closed.