गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या प्लेसमेंट सेलतर्फे पुणे येथील ग्लोबल कोथरूड (एज्युकेशन विंग, टाइम्स ऑफ इंडिया ग्रुप) यांच्या सहकार्याने बुधवार दि. २५ मे २०२२ रोजी सकाळी १०.०० पासून आयोजित मुलाखती सुरु होतील. या मुलाखती महाविद्यालयाच्या मुख्य इमारतीमध्ये सेमिनार हॉल येथे होतील. तरी महाविद्यालयातून पदवी घेतलेले २०१९-२०, २०२०-२१, २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात उत्तीर्ण झालेले तसेच २०२१-२२ या वर्षात पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेला बसलेले विद्यार्थी यामध्ये सहभागी होऊ शकतात. इच्छुक विद्यार्थ्यांनी सर्व आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे.
आय.सी.आय.सी.आय., एच.डी.एफ.सी., अॅक्सिस, येस, इंडस इंड, कोटक, आर.बी.एल., बंधन, डी.सी.बी. इ. बँकांपैकी जागांच्या उपलब्धतेनुसार बँकांकरिता मुलाखती होती
अधिक माहितीसाठी प्लेसमेंट सेलचे समन्वयक डॉ. रुपेश सावंत, मोबा. ९४२११ ४२५२९ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्रा. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी केले आहे.