gogate-college-autonomous-updated-logo

राष्ट्रीय स्तरावरील अन्वेषण संशोधन स्पर्धेसाठीमुंबई विद्यापीठ संघात गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचा विद्यार्थी चिन्मय प्रभूची निवड

gjc-chinmay-prabhu

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या चिन्मय प्रभू यांची प्रा. सी. ए.अजिंक्य राजीव पिलणकर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘एस. टी. महामंडळाचे पुनरुत्थान/पुनरुज्जीवन करण्यासाठीचे सूचक मॉडेल’ या विषयावर प्रकल्प सादर करून मुंबई विद्यापीठाच्या राष्ट्रीय स्तरावरील अन्वेषण संशोधन स्पर्धेसाठीच्या संघात स्थान मिळवले आहे.

प्रतिवर्षी राष्ट्रीय स्तरावरील अन्वेषण संशोधन स्पर्धा घेतली जाते ज्यात भारतातील सर्व विद्यापीठे सहभागी होतात. या प्रतिष्ठेच्या स्पधेत दर्जेदार संघ निवडताना मुंबई विद्यापीठ त्यांच्याशी संलग्न असलेल्या सुमारे ७८१ महाविद्यालयातून संशोधन प्रकल्प निवडते. यावर्षीसर्व महाविद्यालयातून केवळ ५ संशोधन प्रकल्प हे अन्वेषण संशोधन स्पर्धेसाठी मुंबई विद्यापीठ संघात निवडले गेले असून त्यात गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचा प्रकल्प समाविष्ट आहे. राष्ट्रीय स्तरावर संशोधन स्पर्धेत सहभागी होण्याची महविद्यालयाची ही दुसरी वेळ आहे.

सदर संशोधन प्रकल्पात महाराष्ट्र एस. टी. महामंडळाची २०११ पासून २०२० पर्यंतची वित्तीय पत्रकांवरून विविध गुणोत्तरे आणि त्यांच्या महत्त्वाच्या आर्थिक निकषांचा कल अभ्यासला आहे. त्यावरून तोट्यात चालणाऱ्या महाराष्ट्र एस. टी. महामंडळाचे पुनरुत्थान /पुनरुज्जीवन करण्यासाठीचे मॉडेल त्यांनी सुचवले. या नवीन संकल्पनेचे स्पर्धा परीक्षकांनी कौतुक केले. प्राध्यापक अजिंक्य राजीव पिलणकर यांच्या मार्गदर्शनाखाली चिन्मय प्रभू यांचे आविष्कार संशोधन स्पर्धेत विद्यापीठ स्तरावर तसेच राज्य स्तरावर यश संपादन केलेले आहे.

मॉडेलमधे महाराष्ट्र एस. टी. महामंडळ (MSRTC) चा तोटा होण्यामागची कारणे अभ्यासली आहेत आणि त्यावरून त्यांचा लोड फॅक्टर म्हणजे प्रति बस मागे प्रवाशांची संख्या वाढवण्यासाठी कोणते उपाय करता येतील हे दाखवले आहे. तसेच प्रति किलोमीटर उत्पन्न वाढवण्यासाठी, एकूण खर्च कमी करण्यासाठी आणि महाराष्ट्र एस. टी. महामंडळ (MSRTC) साठी नवीन उत्पन्नाच्या संधी कोणत्या असतील ते दाखवले आहे. भारतात ३७ एस. टी. महामंडळापैकी UPSRTC म्हणजेच उत्तर प्रदेश एस. टी. महामंडळ आणि PSRTC म्हणजे पंजाब एस टी महामंडळ हे केवळ नफ्यामध्ये आहेत. बाकी ३५ महामंडळ तोट्यात चालली आहेत त्यामुळे मॉडेल फक्त महाराष्ट्र एस. टी. महामंडळापुरते उपयुक्त नाही तर भारतातील तोटयात चालणाऱ्या सर्व ३५ एस. टी. महामंडळांसाठी आहे. त्यांना ही माहिती व मॉडेल त्यांचा जुना तोटा भरून काढून आणि भविष्यातील कामगिरी सुधारण्यासाठी उपयुक्त ठरेल.

सदर स्पर्धेसाठी त्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी, उपप्राचार्य डॉ. एम. आर. साखळकर, वाणिज्य विद्याशाखा प्रमुख डॉ. यास्मिन आवटे, वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. सोनाली कदम आणि संशोधन विभागाचे प्रमुख डॉ. मयूर देसाई यांचे सहकार्य आणि मार्गदर्शन लाभले. सदर यशाबद्दल विद्यार्थ्याचे व त्यांच्या मार्गदर्शक प्राध्यापकाचे संस्थेच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पा पटवर्धन, सेक्रेटरी श्री. सतीश शेवडे व इतर पदाधिकारी यांनी अभिनंदन केले.

Comments are closed.