gogate-college-autonomous-updated-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयामध्ये ‘सनदी लेखापाल – प्रशिक्षण कमवा आणि शिका’ या कौशल्य विकास अभ्यासक्रमाचे आयोजन

गोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरी आणि ICAI-WIRC यांच्या संयुक्त विद्यमाने गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी ‘सनदी लेखापाल- प्रशिक्षण कमवा आणि शिका’ या कौशल्य विकास अभ्यासक्रमाचे आयोजन केले आहे. या अभ्यासक्रमासाठी भारतीय सनदी लेखापाल संस्थेचे पश्चिम विभागाचे अध्यक्ष CA मनीष गाडिया आणि त्यांचे सहकारी तसेच रत्नागिरी शाखेचे अध्यक्ष CA आनंद पंडित आणि त्यांचे सहकारी यांनी मार्गदर्शन केले. या अभ्यासक्रमाची पहिली बॅच 15 जानेवारी 2022 ते 29 जानेवारी 2022 या कालावधीमध्ये सुरू झाली आहे. या अभ्यासक्रमामध्ये विविध विषयांचा अंतर्भाव करण्यात आला आहे. यामध्ये व्यक्तिमत्व विकास, व्यावसायिक संवाद, सामाजिक आणि व्यावसायिक शिष्टाचार, आयकर अंतर्गत ई-फायलिंग, वस्तू आणि सेवा कर, टॅली अकाउंटिंग, एक्सेलचे ज्ञान, लेखापरीक्षणाची साधने आणि विश्लेषण, टीडीएस इत्यादींचा समावेश आहे.

या कौशल्य विकास अभ्यासक्रमामध्ये 118 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला आहे. ‘सनदी लेखापाल- प्रशिक्षण कमवा आणि शिका’ या अभ्यासक्रमाचा व्यावहारिक उपयोग म्हणजे व्यक्तिमत्व विकास आणि अकाउंटन्सी या विषयाचे व्यावहारिक ज्ञान तसेच सनदी लेखापालाची कार्ये समजण्यासाठी निश्चितच फायदा होणार आहे.

रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन, संस्थेचे कार्यवाह श्री. सतीश शेवडे यांनी या अभ्यासक्रमाला प्रोत्साहन दिले आहे.

या कौशल्य विकास अभ्यासक्रमाच्या समन्वयक म्हणून डॉ. मीनल खांडके काम पाहत आहेत. वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. सीमा कदम, वाणिज्य विभागाच्या उपप्राचार्या डॉ. यास्मिन आवटे, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

Comments are closed.