संपूर्ण भारतामध्ये हर घर तिरंगा साजरा करण्यात आला त्याचप्रमाणे गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील वाणिज्य विभागाने 75व्या अमृतमहोत्सवामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. महाविद्यालयामध्ये वाणिज्य भागातील प्रत्येक वर्गामध्ये हर क्लास तिरंगा साजरा करण्यात आला होता. यामध्ये प्रत्येक वर्गामध्ये वर्ग सजावट करण्यात आली. पोस्टरस्पर्धा, रांगोळीस्पर्धा, देशभक्तीपरगीतगायन अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन वाणिज्य विभागाने केले वाणिज्य विभागातील 1800 विद्यार्थ्यांनी यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता. या कार्यक्रमाचे नेतृत्वएस. वाय. बी. कॉमच्या सलोनी मोहन देसाई, समृद्धी राजेश लिंगायत, तनुश्री विजय भट या तीन विद्यार्थिनींनी केले.
दि. ९ऑगस्ट ते दि. १७ ऑगस्ट २०२२ या कालावधीमध्ये अमृतमहोत्सव साजरा करण्यात आला होता. प्रत्येक वर्गामध्ये दररोज एक उपक्रम राबविण्यात आला. ज्यामध्ये आझादी का अमृतमहोत्स व याविषयावर व्याख्यान, कविता वाचन असे अनेक उपक्रम करण्यात आले. दि. १३ ऑगस्ट रोजी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. मकरंद साखळकर तीनही शाखेच्या उपप्राचार्या व इतर शिक्षकांनी प्रत्येकवर्गाला भेट दिली, तसेच त्यादिवशी विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा केली होती यामध्ये भारतातील सांस्कृतिक विविधता दिसून आली. दि. १७ ऑगस्ट रोजी कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला यामध्ये विविध कार्यक्रम व बक्षिस वितरण करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून तबत्सुम मस्तान लाभल्या होत्या. तबत्सुम मस्तान या २००६ ते २०११ या कालावधीमध्ये गोगटे जोगळेकर महाविद्यालयामध्ये प्राध्यापिका म्हणून कार्यरत होत्या; सध्या त्या मानांकित आंतरराष्ट्रीय व्यावसायिक स्कूलमध्ये प्राध्यापिका आहेत.
रांगोळी स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक टी. वाय. बी. कॉम. सी, द्वितीय पारितोषिक एस. वाय. बीकॉम. सी तसेच तृतीय पारितोषिक एस. वाय. अकाउंटिंग फायनान्स. बी.; पोस्टर स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक रिद्देशसावंत, द्वितीय पारितोषिक विभागून देण्यात आले शिलज नेवरेकर आणि साक्षी सागवेकर तृतीय पारितोषिके विभागून देण्यात आले. अक्षया कुलकर्णी आणि कशिश काझी. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये एकी निर्माण झाली आणि देशप्रेम वृद्धिंगत झाले. कार्यक्रमाची सांगता वृक्षारोपण करून करण्यात आली.
महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, वाणिज्य विभागाच्या उपप्राचार्या डॉ. यास्मिन आवटे, वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. सीमा कदम तसेच डॉ. मीनल खांडके यांच्या मार्गदर्शनामुळे कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मदत झाली.