gogate-college-autonomous-updated-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयामध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा

गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील महिला विकास कक्षातर्फे दि. 8 मार्च 2022 रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यात आला. आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयातील विद्यार्थिनींसाठी ‘मासिक पाळी संदर्भातील सर्वकाही’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख वक्त्या म्हणून गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. मधुरा मुकादम या लाभल्या होत्या.

डॉ. मधुरा मुकादम यांनी आपल्या व्याख्यानातून मुलींना मासिक पाळी हा स्त्रियांच्या जीवनातील एक महत्वाचा भाग असून त्या काळात स्त्रियांच्या शरीरात होणारे बदल, त्यांना कारणीभूत असणारी संप्रेरके, त्या काळात घ्यायची काळजी, स्वच्छता आणि संप्रेरकांच्या असमतोलामधून उद्भवणारे विविध आजार यांची शास्त्रशुद्ध माहिती दिली.

या कार्यक्रमाला महाविद्यालयातील सुमारे १०० विद्यार्थिनी व महिला प्राध्यापिका उपस्थित होत्या. या कार्यक्रमामध्ये विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला आणि कवितावाचन, स्वतःचे अनुभव त्यांनी व्यक्त केले. महिला प्राध्यापकांनी ही आपले स्वानुभव व्यक्त केले.

परंपरांच्या मागील शास्त्रीय माहिती जाणून घेऊन व्यवहारात वागत असताना अंधश्रद्धेला बळी न पडता आपले कर्तव्य धैर्याने पार पाडावे असे वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. सीमा कदम यांनी त्यांच्या मार्गदर्शनामध्ये सांगितले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले.

सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन प्रा. अश्विनी देवस्थळी यांनी केले.

Comments are closed.