gogate-college-autonomous-updated-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाला विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयामार्फत DBT STAR अनुदान प्राप्त

रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या गोगटे जोगळेकर महाविद्यालयाला स्टार कॉलेज अंतर्गत भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयातर्फे रु. ७८,५३,३२२/- रकमेचे अनुदान प्राप्त झाले आहे. असे अनुदान प्राप्त करणारे गोगटे जोगळेकर महाविद्यालय प्राप्त करणारे गोगटे जोगळेकर महाविद्यालय हे कोकणातील पहिले महाविद्यालय आहे.

सदर अनुदान महाविद्यालयातील भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, प्राणीशास्त्र या विभागांना मिळाले आहे. या अनुदानाचा वापर प्रयोगशाळेतील उपकरण खरेदी, शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यासाठी विविध कार्यशाळांचे आयोजन करणे, राष्ट्रीय स्तरावरील विविध प्रयोगशाळांना भेटी देणे याकरिता करता येणार आहे. याचा लाभ पदवीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना होणार आहे.

गोगटे जोगळेकर महाविद्यालयास अशाप्रकारचे अनुदान प्राप्त झाल्याबद्दल रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा मान. श्रीम. शिल्पाताई पटवर्धन आणि कार्यवाह मान. श्री. सतीश शेवडे यांनी महाविद्यालयाचे हार्दिक अभिनंदन केले आहे.

Comments are closed.