gogate-college-autonomous-updated-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील डॉ. चित्रा गोस्वामी यांचे पुस्तक अभिवाचन स्पर्धेत सुयश

gjc-dr-chitra-goswami

शंकरराव मोहिते महाविद्यालय, अकलूज यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय पुस्तक अभिवाचन स्पर्धेत गोगटेजोगळेकर महाविद्यालयातीलप्रो. डॉ. चित्रा गोस्वामी यांनी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त केले. शंकरराव मोहिते महाविद्यालय, अकलूज यांच्या वतीने राज्यस्तरीय ऑनलाईन पुस्तक अभिवाचन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातील कला शाखा उपप्राचार्या आणि हिंदी विभागातील डॉ. चित्रा गोस्वामी यांनी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त केले. या स्पर्धेचा विषय आणि भाषा स्पर्धकाने निवडायची होती. डॉ. गोस्वामी यांनी हिंदीतील सुप्रसिद्ध लेखक अमरकांत यांची ‘नौकर’ ही हिंदी कहाणी अभिवाचनासाठी निवड करून अत्यंत अभिनव आणि अभिनयात्मक पद्धतीने अभिवाचन केले. या स्पर्धेत राज्यभरातून अनेक स्पर्धकांनी उस्फुर्त सहभाग नोंदवला.

डॉ. गोस्वामी यांनी आजपर्यंत १७ हिंदी, मराठी पुस्तकांचे लेखन केले असून, कविता, कथा, बालसाहित्य अशा विविधांगी साहित्यप्रकारात लेखन करून आपले साहित्यिक योगदान दिले आहे. त्यांचे विविध राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय संशोधन पत्रिकांमध्ये शोधनिबंध प्रकाशित झाले असून, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील चर्चासत्र- परिषदांमध्ये त्यांनी विविध विषयांवरील शोधनिबंधाचेसादरीकरण केले आहे. त्यात साधनव्यक्ती म्हणूनही काम पाहिले आहे. त्या मुंबई विद्यापीठाचे हिंदी अभ्यासमंडळ सदस्य, महाविद्यालयातील विविध महत्वाच्या समित्यांमध्येसदस्य म्हणून कार्यरत असून, विविध बाह्य आस्थापनांवरही कार्यरत आहेत.

त्यांच्या यशाबद्दल रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीमती शिल्पाताई पटवर्धन, सचिव श्री. सतीशजी शेवडे, गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, प्रबंधक श्री. रवींद्र केतकर, हिंदी विभागप्रमुख डॉ. शाहू मधाळे, महाविद्यालयातील शिक्षक आदींनी अभिनंदन केले आहे.

Comments are closed.