सप्टेंबर २०२१ मध्ये सहाय्यक प्राध्यापक पदासाठी सावित्रीबाई फुले विद्यापीठामार्फत घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय पात्रता चाचणी (सेट) परीक्षेत गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या अर्थशास्त्र विभागाचा विद्यार्थी सुदर्शन ठाकूर पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झाला. त्याचा सत्कार अर्थशास्त्र विभागामार्फत करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविकात विभाग प्रमुख डॉ. आर. ए. सरतापे यांनी कार्यक्रमाचा उद्देश सांगून उपस्थितांचे स्वागत केले.
उपस्थितांशी संवाद साधताना कला शाखेचे उपप्राचार्य डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई यांनी सेट परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थी सुदर्शन ठाकूर तसेच अर्थशास्त्र विभागाचे अभिनंदन केले आणि भावी वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या. अशाप्रकारच्या परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आपला ज्ञानाची तपासणी करून आपले जीवन यशस्वी करावे असे मनोगत व्यक्त केले.
अर्थशास्त्र विभागामार्फत विद्यार्थी विकासासाठी विविध उपक्रमांचे मार्गदर्शन केले जाते, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, क्षेत्राभेट, संशोधन प्रकल्प मार्गदर्शन, सेट-नेट परीक्षा मार्गदर्शन अशा उपक्रमांतून विद्यार्थी आपल्या भावी जीवनासाठी अधिक सक्षम होतात. या उपक्रमांचे फलित म्हणून यापूर्वी विद्यापीठ पातळीवर संशोधन स्पर्धेत विभागाने आतापर्यंत ०७ पारितोषिके प्राप्त केली आहेत.
सुदार्षांच्या यशाने विभागाच्या शिरपेचात आणखी एक मनाचा तुरा रोवला गेला आहे. विभाग विद्यार्थ्यांच्या हितासाठी सातत्याने क्रियाशील राहील अशी खात्री विभागप्रमुखांनी याप्रसंगी व्यक्त केली. या यशात विभागातील सहकारी डॉ. दिनेश माश्रणकर व प्रा. सुर्यकांत माने यांचेही उल्लेखनीय योगदान आहे.
सुदर्शन आणि अर्थशास्त्र विभाग यांचे कला शाखेतील प्राध्यापक आणि गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी हार्दिक अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.