भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षांनिमित्त गोगटे जोगळेकर महाविद्यालयात विविध समाजपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
दि. ९ ऑगस्ट रोजी महाविद्यालयातसामुदायिक राष्ट्रगीत गायन करण्यात आले. जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय आणि पोलीस विभागयांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस मुख्यालय ते लोकमान्य टिळक जन्मभूमी, रत्नागिरी अशा राष्ट्रभक्तीपर जनजागृती प्रभातफेरी, झेंडावंदन आणि सामुहिक राष्ट्रगीत गायन कार्यक्रमात नौदल एन.सी.सी. आणि एन. एस. एस. विभागातील विद्यार्थांनी सहभाग नोंदविला. पुरातत्व विभाग, रत्नागिरी आणि एन.सी.सी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने थिबा राजवाडा, रत्नागिरी येथे,तर एन. एन. एस. विभागाच्यावतीने लोकमान्य टिळक स्मारक परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. एन. एस.एस.च्या विद्यार्थांनी पोलीस परेड मैदान आणि महाविद्यालयात पथनाट्याचे सादरीकरणकेले.
प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांकरिता आयोजित Principal Address प्रसंगीसामूहिक राष्ट्रगीत गायन, सामूहिक प्रतिज्ञा घेण्यात आली. समाजशास्त्र, इतिहास, राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र विभागातील विद्यार्थानी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्त्रीविषयक विचार’, ‘लोकमान्य बाळ गंगाधर टिळक’,’बहिष्कृत भारत’ मधील लिखाण’, ‘स्वा. सावरकर आणि रत्नागिरी’, ‘कोकणातील महत्त्वाच्या ऐतिहासिक घटना’, ‘जाखडी नृत्य – कोकणचासांस्कृतिक ठेवा’, ‘कोकणातील शिलाहार घराणे’, ‘कोकणातील बंदरे, ‘भारतीय नौदल’, ‘कोकणातील लोककला- नमन’, ‘भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील बाल क्रांतिकारक’, ‘आझाद हिंद फौज’, ‘मिठाचा सत्याग्रह’, ‘भारतीय मुस्लीम खाद्यसंस्कृती आणि सण’, ‘NCC Navy’, ‘माझ्या गावातील गणेशोत्सव’, ‘कोकणातीलशिमगोत्सव’, ‘माझे गाव’ विषयांवर सादरीकरण केले. वाणिज्य आणि हिंदी विभागाच्या वतीने अनुक्रमे ‘आझादी का अमृत महोत्सव’ या विषयावर व्याख्यान, राष्ट्रीय हिंदी कवींच्या कविता पठण कार्यक्रम घेण्यात आला. माहिती तंत्रज्ञान विभागाच्यावतीने ‘My Contribution for My Nation’, ‘HarGharTiranga: Positive and Negative Impact’, ‘Upcoming Future of Nation’ या विषयांवरील गट चर्चा आणि वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मराठी, संस्कृत, हिंदी आणि वाणिज्य विभागाच्यावतीने अनुक्रमे देशभक्तीपर वक्तृत्व, निबंध, चित्रकला, मूकनाट्य, स्कीट, गीत गायन स्पर्धा इ.चे आयोजन करण्यात आले होते.यास्पर्धेचे परीक्षण प्रा. जयंत अभ्यंकरआणि प्रा. मधुरा दाते यांनी केले. स्पर्धेचे आयोजक म्हणून मराठी विभागप्रमुख प्रा. शिवराज गोपाळे यांनी तर स्पर्धा समन्वयक म्हणून प्रा. जयंत अभ्यंकर यांनी काम पाहिले.
महाविद्यालयामध्ये वाणिज्य शाखेतील प्रत्येक वर्गामध्ये ‘हर घर तिरंगा’ या अभियानाच्या पार्श्वभूमीवर ‘हर क्लास तिरंगा’ हा उपक्रम राबविण्यात आला. नौदल एन.सी.सी., एन.एन.एस., आजीवन अध्ययन विस्तार विभागाच्या वतीने महाविद्यालय, ग्रंथालय परिसरात आणि विभाग पातळीवरस्वच्छता कार्यक्रम आयोजित केला होता. एन.सी. सी., एन.एन.एस., आजीवन अध्ययन विस्तार विभाग, नेचर क्लब विभागाच्यावतीने वृक्षारोपणकार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नौदल एन.सी.सी. विभागातील छात्रांनीआपल्या घराच्या परिसरात, तर एन.एस. एस.च्या स्वयंसेवकांनी काळबादेवी येथेवृक्षारोपण केले.
दि. १५ ऑगस्ट रोजी दरवर्षीप्रमाणेमहाविद्यालयात ध्वजारोहण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर प्र.प्राचार्य कुलकर्णी यांनी एन.सी. सी. छात्र विद्यार्थांना राष्ट्रीय एकात्मतेचीशपथ दिली. लेफ्टनंट डॉ. स्वामिनाथन भट्टर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय छात्रसेनेच्या विद्यार्थ्यांनी शानदार संचलन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लेफ्टनंट प्रा. दिलीप सरदेसाई यांनी केले. त्यानंत रग्रंथालयात विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या क्रांतिकारकांची माहिती, लेख आणि चित्रे यांचा समावेश असलेल्या ‘स्वातंत्र्यलढ्यातील लोकोत्तर पुरुषांचे योगदान’ या विषयावरील ‘सहकार’ भित्तीपत्रक प्रदर्शनाचे तरमुख्य इमारतीत राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या ‘आझादी का अमृत महोत्सव’ आणि ‘हरघर तिरंगा’ विषयाला अनुसरून भित्तीपत्रकाचे अनावरण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.वरिष्ठ आणि कनिष्ठम हाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या अनुक्रमे ‘माध्यम’ आणि ‘मशाल’ या हस्तलिखितांचे प्रकाशन करण्यात आले. यानंतर सांस्कृतिक विभागाच्यावतीने देशभक्तीपर समूहगीतांचे सादरीकरण करण्यात आले.
दि. १६ ऑगस्ट रोजी ग्रंथालयात इतिहास, भारतीयस्वातंत्र्य लढा, क्रांतिकारक, देशभक्त इ. साहित्यविषयक ग्रंथांचे प्रदर्शन तरशास्त्र शाखेच्या वतीने ‘स्वातंत्र्योत्तर कालखंडातील विज्ञान आणि तंत्रज्ञानक्षेत्रातील प्रगती’ या विषयावरील भित्तीपत्रक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आलेहोते. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना देशभक्तक्रांतीकारक आणि भारतीय इतिहासातील अजरामर व्यक्तींची चरित्रमाला स्मरणात आणूनद्यावी या उद्देशानेहिंदू जागृतीजनजागृती समितीच्या वतीने भारतीयदेशभक्त आणि त्यांनी देशासाठी दिलेल्या बलिदानाविषयी माहिती देणाऱ्या पोस्टरप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव सांगता समारोहप्रसंगी महाविद्यालयातील फिल्म क्लबच्या वतीने डॉ. ज. शं. केळकर सभागृहात देशभक्तीपर चित्रपटाचे सादरीकरण करण्यात आले. फिल्म क्लबचे उद्घाटन रत्नागिरीफिल्म सोसायटीचे डॉ. नितीन चव्हाण यांच्या हस्तेझाले. सामुहिक राष्ट्गीत गायनानंतर नीलामाधब पांडा दिग्दर्शित ‘आय अॅम कलाम’ हा चित्रपटविद्यार्थांना दाखविण्यात आला. याप्रसंगी प्रमुख अतिथी बँक ऑफ महाराष्ट्राचेक्षेत्रीय प्रबंधक श्री. आनंद शंकर, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, व्यवस्थापक श्री. कैलास राहाडे, फिल्म क्लबच्या समन्वयक डॉ. निधी पटवर्धन आदिमान्यवर उपस्थित होते. बँक ऑफ महाराष्ट्राने महाविद्यालयाच्या फिल्म क्लबकरिता ६५इंची टीव्ही भेट म्हणून दिला.
स्वातंत्र्याच्याअमृत महोत्सवी वर्षांनिमित्त गट शिक्षण अधिकारी, पंचायत समिती, रत्नागिरी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘हर घर तिरंगा’ या तालुकास्तरीय उपक्रमा अंतर्गत प्रश्नमंजुषा स्पर्धेकरिता महाविद्यालयातीलकाही प्राध्यापक वर्गाने प्रश्नपत्रिका निर्मिती कार्यात आपले योगदान दिले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षांच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालय परिसरात ‘हर घर तिरंगा’ अभियानासंदर्भात विद्यार्थी-पालक यांच्यात जनजागृती निर्माण करणारा सेल्फी पॉइंट उभारण्यात आला होता.
हा कार्यक्रम यशस्वीपणे पारपाडण्यासाठी रत्नागिरी शिक्षण संस्था, महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांचे मोलाचेमार्गदर्शन तर कला, विज्ञान, वाणिज्य शाखेच्या उपप्राचार्या अनुक्रमेडॉ. चित्रा गोस्वामी, डॉ. अपर्णा कुलकर्णी, डॉ. यास्मिन आवटे, ग्रंथपाल श्री. किरण धांडोरे, विविध विभागप्रमुख, प्रबंधक श्री. रवींद्र केतकर, श्री. प्रसाद गवाणकर, श्री. विजयकुमार काकतकर, श्री. अमलेश तांबे, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, सेवक वर्ग, विद्यार्थी यांचे सहकार्य लाभले.या अभियानाअंतर्गत पार पडलेल्या सर्व राष्ट्रीय कार्यक्रमात वरिष्ठ आणि कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक-अध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, सेवक वर्ग, विद्यार्थी उस्फुर्तपणे सहभागी झाले.