राज्यपाल कार्यालयाच्यावतीने घेण्यात येणाऱ्या आव्हान शिबिराचे आयोजन २०१७ या विद्यमान वर्षी शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे उत्साहाने संपन्न झाले. या शिबिराचे विशेष म्हणजे राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवकांना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण दिले जाते. नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्ती उद्भवू नये किंबहुना ती उद्भवलीच तर त्यावर कशा प्रकारे मात करावी याचे सुसूत्रपद्धतीने प्रशिक्षण या शिबिरामध्ये सहभागी स्वयंसेवकांना दिले जाते.
‘नोट मी बट यू’ हे ब्रीदवाक्य असणाऱ्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांना हि मोठी पर्वणीच असते. दि. १ जून ते १० जून २०१७ या कालावधीत पार पडलेल्या शिबिरामध्ये स्वयंसेवकांना शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, पोलीस महानिरीक्षक श्री. विश्वास नांगरे-पाटील, डॉ. अतुल साळुंखे, डॉ. डी. टी. शिर्के, डॉ. विलास नांदवडेकर यांचे मार्गदर्शन लाभले.
या कामगिरीबद्दल कु. हर्षदा हिला गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी शुभेच्छा दिल्या.