gogate-college-autonomous-updated-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात ७५ वा भारतीय स्वातंत्र्यदिन विविधरंगी कार्यक्रमांनी उत्साहपूर्ण वातावरणात साजरा

gjc-independence-day-2022-1

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात ७५वा भारतीय स्वातंत्र्यदिन विविधरंगी कार्यक्रमांनी उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. सकाळी महाविद्यालयाच्या जवाहर क्रीडांगणावर ध्वजवंदनाचा मुख्य कार्यक्रम संपन्न झाला. प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी एन.सी. सी. छात्र विद्यार्थांना स्वातंत्र्यदिनी घ्यावयाची शपथ दिली. लेफ्टनंट डॉ. स्वामिनाथन भट्टर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांनी शानदार संचलन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लेफ्टनंट प्रा. दिलीप सरदेसाई यांनी केले.

त्यानंतर ग्रंथालयात ‘स्वातंत्र्यलढ्यातील लोकोत्तर पुरुषांचे योगदान’ या सहकारभित्तीपत्रकाचे प्रभारी प्राचार्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. मुख्य इमारतीत गणित विभागाच्या ‘Use of Mathematics in Cryptography’; माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या ‘Trap of Mobile Gaming’ आणि महिला विकास कक्षाच्या ‘स्वातंत्र्योत्तर भारतातील महिलांचे बदलते स्वरूप’ या विषयावरील ‘मिळून साऱ्याजणी’ या भित्तीपत्रकाचे तसेचराष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या ‘आझादी का अमृत महोत्सव’ आणि ‘हर घर तिरंगा’ विषयाला अनुसरून भित्तीपत्रकाचेअनावरण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

महाविद्यालयाच्या राधाबाई शेट्ये सभागृहात संपन्न झालेल्या मुख्य समारंभात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अभ्यंकर-कुलकर्णीकनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. चिंतामणी दामले यांनी केले. त्यानंतरवरिष्ठ आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या अनुक्रमे ‘माध्यम’ आणि ‘मशाल’ या हस्तलिखितांचे प्रकाशन करण्यात आले.यंदाचा विशेष उपक्रम म्हणजे माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या विद्यार्थांनी तयार केलेल्या ‘Library In-Out Management System’ या software आणि अर्थशास्त्र विभागाच्या ‘अर्थशोध’ या वार्षिकांकाचे प्रथम प्रकाशन करण्यात आले. गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचा सन २०२१- २२चा वार्षिकांक ‘सहकार’ यावेळी प्रकाशित करण्यात आला. याप्रसंगी महाविद्यालयातील संस्कृत विभाग आणि कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ, रामटेक (रत्नागिरी उपकेंद्र) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘धर्म, धर्मशास्त्र आणि संस्कृती’ या विषयावरील आयोजित करण्यात येणाऱ्या दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेची माहिती संस्कृत विभागप्रमुख प्रा. डॉ. कल्पना आठल्ये यांनी देऊन या परिषदेत संपन्न होणाऱ्या चर्चासत्रांचा लाभ सर्वांनी घ्यावा, असे आवाहन उपस्थितांना केले. त्यानंतर विविध क्षेत्रात विशेष नैपुण्य प्राप्त केलेल्या वरिष्ठ आणि कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी आणि प्राध्यापकांचा मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक आणि प्रशस्तीपत्र प्रदान करून गुणगौरव करण्यात आला.

या समारंभाचे अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी महाविद्यालय, महाविद्यालयीन प्राध्यापक आणि विद्यार्थी करीत असलेल्या विविध क्षेत्रातील नैपुण्याचा आढावा घेतला. वाचन संस्कृती दुर्मिळ होत चालली असून, आपण हल्ली कोणी वाचत नाही. त्यामुळे आपल्या दैनंदिन कामकाजाव्यतिरिक्त आपण सर्वांनी वाचन करणे आवश्यक आहे, तसेच वाचन चळवळ वाढविण्यासाठी आणि विद्यार्थांचे ज्ञान वृद्धिंगत करण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्नपूर्वक कार्य केले पाहिजे, असेमत त्यांनी व्यक्त केले.

याप्रसंगी व्यासपीठावर संस्थेचे सहकार्यवाह प्रा. श्रीकांत दुदगीकर,प्रशासकीय उपप्राचार्य प्रा. डॉ. मकरंद साखळकर, कला, वाणिज्य आणि शास्त्र शाखेच्या उपप्राचार्या अनुक्रमे डॉ. चित्रा गोस्वामी, डॉ. यास्मिन आवटे, डॉ. अपर्णा कुलकर्णी, प्रा. चिंतामणी दामले आदि मान्यवरउपस्थित होते.यानंतर सांस्कृतिक विभागाच्यावतीने देशभक्तीपर समूहगीतांचे सादरीकरण करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रूना नागवेकर तरआभारप्रदर्शन प्रा. अस्मिता कुलकर्णी यांनी केले. या कार्यक्रमाला सर्व प्राध्यापक, अध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री. प्रसाद गवाणकर, समारंभ समिती सदस्य, सेवक वर्ग, विद्यार्थी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

gjc-independence-day-2022-2
Comments are closed.