रत्नागिरी येथील चरित्रकार पद्मभूषण डॉ धनंजय कीर मुंबई विद्यापीठ उपपरिसर आणि गोगटे जोगळेकर महाविद्यालयातर्फे खगोलशास्त्र विषयातील प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. सदर अभ्यासक्रम मुंबई विद्यापीठ मान्यताप्राप्त आहे. लोकमान्य टिळक अभ्यास आणि संशोधन केंद्र या मुंबई विद्यापीठाच्या केंद्राद्वारे ह्या अभ्यासक्रमाची निर्मीती झाली आहे.
खगोलविश्वाच्या रंजक गोष्टी उलगडून दाखवणारा आणि नवा अनुभव देणारा मुंबई विद्यापीठाचा हा अभ्यासक्रम सहा महिने कालावधीचा असून ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा मिश्र प्रकारे घेतला जाणार आहे. आकाश निरीक्षण, दुर्बिणीद्वारे आकाश दर्शन, ग्रह तारकांची माहिती, आकाश निरीक्षणासाठी संगणकाचा उपयोग इ. विषयांचा अंतर्भाव या अभ्यासक्रमात असेल. अभ्यासक्रम शिकवण्यासाठी खगोलशास्त्र विषयातील अनुभवी तज्ञ उपलब्ध असतील. या अभ्यासक्रमासाठी बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तसेच यासंदर्भातील आवड असणारी वा कुतुहल असणारी व्यक्ती प्रवेश घेउ शकेल. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर मुंबई विद्यापीठाचे प्रमाणपत्र मिळणार आहे तसेच विद्यार्थी आकाश निरीक्षणाचे कार्यक्रम स्वतः करू शकतील.
अभ्यासक्रमाच्या अधिक माहिती आणि नावनोंदणीसाठी प्रा. शिरीन लिमये (7276802270), रत्नागिरी विद्यापीठ उपकेंद्र; डॉ विवेक भिडे (9421139296) प्रा. निशा केळकर (9405072376)- खगोल अभ्यास केंद्र, भौतिकशास्त्र विभाग गोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरी यांच्याशी संपर्क साधावा. सदर नावनोंदणी दि. १० जानेवारी २०२२ पर्यंत चालू राहील आणि दि. १५ जानेवारी २०२२ पासून अभ्यासक्रम सुरु होईल. या अभ्यासक्रमासाठी मर्यादित जागा असल्याने इच्छुकांनी लवकरात लवकर नावनोंदणी करावी.
तरी अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन रत्नागिरी विद्यापीठ उपकेंद्रांचे प्र. संचालक डॉ किशोर सुखटणकर आणि गोगटे जोगळेकर महाविद्यालायाचे प्र. प्राचार्य डॉ पी पी कुलकर्णी यांनी केले आहे.