gogate-college-autonomous-updated-logo

कै. बाबुराव जोशी ग्रंथालयात दिवाळी अंक प्रदर्शनाचे उद्घाटन संपन्न

gjc-library-diwali-2022-magazine-pradarshan

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या कै. बाबुराव जोशी ग्रंथालयात प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांच्या हस्ते दिवाळी अंक २०२२ चे उद्घाटन संपन्न झाले. याप्रसंगी प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, विज्ञान शाखेच्या उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी, कला शाखेच्या उपप्राचार्या डॉ. चित्रा गोस्वामी, ग्रंथालय समिती समन्वयक आणि संस्कृत विभाग प्रमुख डॉ. कल्पना आठल्ये, ग्रंथपाल श्री. किरण धांडोरे उपस्थित होते.

उपस्थितांचे स्वागत ग्रंथपाल श्री. किरण धांडोरे यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहा. ग्रंथपाल श्री. उत्पल वाकडे यांनी केले. उपस्थितांशी संवाद साधताना प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी म्हणाले, ‘दिवाळी अंक हा दिवाळी सणाचा आनंद द्विगुणित करणारा एक महत्वाचा घटक आहे. फराळासोबत दिवाळी अंक हाती असणे एक साहित्यिक पर्वणीच असते. कथा, कविता, वैचारिक लेख, ऐतिहासिक माहिती, गड-किल्ले, आरोग्य, अर्थ, सामान्य ज्ञान इ. साहित्य प्रकार समोर ठेऊन या अंकांची केलेली निर्मिती हा एक महत्वाचा वार्षिक दस्तऐवज आहे.’ यावर्षीचे दिवाळी अंक यादृष्टीने विविधांगी असून महाविद्यालयीन प्राध्यापक आणि विद्यार्थी यांना निश्चितच वाचनीय ठरतील असा आशावाद त्यांनी याप्रसंगी व्यक्त केला.

कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन वाचक गटाचा विद्यार्थी ओंकार आठवले याने केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयीन प्राध्यापक, वाचक गटाचे विद्यार्थी, कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ग्रंथालय कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली.

Comments are closed.