gogate-college-autonomous-updated-logo

कै. बाबुराव जोशी ग्रंथालयात पदव्युत्तर कला विभागातील विद्यार्थ्यांसाठी माहिती कार्यशाळा संपन्न

gjc-library-workshop-for-pg-1

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या कै. बाबुराव जोशी ग्रंथालयात एम. ए. भाग- १ आणि भाग- २ मधील विद्यार्थ्यांकरिता ‘ग्रंथालय माहिती कार्यशाळा’ नुकतीच संपन्न झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि उपस्थितांचे स्वागत करताना पदव्युत्तर विभागाचे प्रमुख डॉ. शाहू मधाळे यांनी सदर कार्यशाळेच्या आयोजनाचे महत्व विषद केले. प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ‘विद्यार्थ्यांनी अधिक वाचन करून संशोधनाकडे वळावे’ असे सांगून शिक्षण आपल्याला स्वावलंबी आणि संवेदनशील बनवते, महाविद्यालयाच्या सुसज्ज आणि समृद्ध ग्रंथालयाचा उपयोग आपल्या शैक्षणिक जीवनात करून घ्या, असे आवाहन केले.

त्यानंतरच्या सत्रात महाविद्यालयीन ग्रंथालयाचा परिचय ग्रंथपाल श्री. किरण धांडोरे यांनी करून दिला. ग्रंथालयातील उपलब्ध वाचन साहित्य आणि ई-रिसोअर्स यांचा पीपीटीच्या माध्यमातून सविस्तर आढावा घेतला. स्पर्धा परीक्षा, इतर परीक्षा, मुलाखती आणि परीक्षा याविषयी चर्चा केली. महाविद्यालयीन ग्रंथालयाचे सर्व उपक्रम विद्यार्थीकेंद्रित असे असून या उपक्रमात सहभागी होऊन सर्व विद्यार्थ्यांनी आपली शैक्षणिक प्रगती करून घ्यावी असे आवाहन केले.

या कार्यक्रमाला इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. अतुल पित्रे, प्रा. वासुदेव आठल्ये, अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. रामा सरतापे, डॉ. माश्रणकर, प्रा. डी. एस. कांबळे, ग्रंथालय कर्मचारी आणि पदव्युत्तर विभागातील विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहायक ग्रंथपाल श्री. उत्पल वाकडे यांनी तर आभारप्रदर्शन प्रा. कृष्णात खांडेकर यांनी केले.

gjc-library-workshop-for-pg-1 gjc-library-workshop-for-pg-2

Comments are closed.