मातृभाषेतून विज्ञानाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी मराठी विज्ञान परिषद, मुंबई ही सन १९६४ पासुन कार्यरत आहे. परिषदेचे एकूण ७० विभाग महाराष्ट्र, गोवा, गुजरात व कर्नाटक येथे विज्ञान प्रसारणाचे कार्य करत असून गोगटे जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी येथे सन १९७५ पासुन कार्यरत आहे.
रत्नागिरी कार्यक्षेत्रात विज्ञान प्रसार व प्रचार वृद्धिंगत करण्यासाठी श्री. अ. पां. देशपांडे, कार्यवाह, मराठी विज्ञान परिषद, मध्यवर्ती विभाग, मुंबई हे दि. २४ मार्च २०२२ रोजी सकाळी ११.०० वाजता ज. शं. केळकर सेमिनार हॉल, मुख्य इमारत, गोगटे जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी येथे महाविद्यालय व शाळेतील विद्यार्थी तसेच विज्ञान शिक्षक यांना मार्गदर्शन करणार आहेत.
रत्नागिरी शहरातील माध्यमिक शाळेतील किमान दोन विज्ञान शिक्षक व पाच विद्यार्थी यांनी सदर मार्गदर्शनास आपली उपस्थिती नोंदवावी; असे आवाहन महाविद्यालायचे प्र. प्राचार्य डॉ. पी .पी. कुलकर्णी यांनी केले आहे.