गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या गणित विभागातर्फे विद्यार्थ्यांकरीता दिनांक २७ ऑगस्ट २०२२ रोजी “पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन” ह्या विषयावरील स्पर्धेचे आयोजन केले गेले. ह्याप्रसंगी व्यासपीठावर प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी, गणित विभाग प्रमुख प्रा. दिवाकर करवंजे, स्पर्धेसाठी लाभलेले परीक्षक प्रा. आदिती जोशी व प्रा. केतन जोगळेकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचे स्वागत स्पर्धा समन्वयक प्रा. स्पृहा जोशी यांनी केले. सध्याच्या जगात केवळ डिग्री घेऊन भागत नाही तर तुम्हाला विविध कौशल्ये येणं सुद्धा अपेक्षित असत त्यामुळे अश्या स्पर्धांमुळे ते नक्कीच विकसित होतील. येणाऱ्या काळात स्वायत्त महाविद्यालय झाल्यानंतर आपण कौशल्ये विकासाच्या दृष्टीने असे अभ्यासक्रमही चालू करू शकतो असे मनोगत महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी व्यक्त केले. तसेच प्रा. प्रतिक शितुत यांनी पॉवरपॉईंट कसा करावा ह्या विषयावर घेतलेल्या सत्राचे कौतुक करून विद्यार्थ्यांना केवळ स्पर्धेमध्ये उतरवून उपयोग नाही तर त्यांना इनपुट देणंही आवश्यक आहे असे मत व्यक्त केले.
विद्यार्थ्यांना पॉवरपॉईंटचे स्किल्स, स्टेजवरील वावरासाठी आत्मविश्वास मिळाणे, संभाषण कौशल्येयेणे ह्या हेतूने ही स्पर्धा दरवर्षी भरवली जाते. तसेच ह्या स्पर्धेमधील प्रथम दोन क्रमांक राज्यस्तरीय पॉवरपॉईंट स्पर्धेसाठी निवडले जातात.
ह्या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून लाभलेले केतन जोगळेकर यांनी सहभागी विद्यार्थ्याना शांत राहून, आत्मविश्वास ठेऊन कस सादरीकरण कराव, पॉवरपॉईंट कसं असावटेक्नॉलजीचा वापर कसा करावा हयाबद्दल मार्गदर्शन केले. प्रा. आदिती जोशी यांनी त्यांच्यावेळच्या सदर स्पर्धेच्या आठवणी सांगितल्या व आपण हे करू शकतो हा मोठा आत्मविश्वास ह्या स्पर्धेमधून मिळतो हे आवर्जून सांगितले.सादरीकरण करताना वेग कसा असावा, गणिताच्या बेसिक कन्सेप्ट माहिती असाव्यात असेही मत व्यक्त केले.
ह्या स्पर्धेमध्ये एकूण १४ संघ मिळून २६ विद्यार्थ्यानी भाग घेतला होता. त्यातील कु. विनय मोरे, कु. मुस्कान चिकटे व कु. निकिता जाधव आणि कु. ऋतुजा ओक व कु. मृणाल पुरोहित यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय पारितोषिक मिळवले.
आपला विषय चांगल्या पद्धतीने मांडण हे गरजेच असत आणि अश्या स्पर्धांमुळे हे शिकण शक्य आहे असे मत विज्ञान उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी यांनी व्यक्त केले आणि सर्व सहभागीविद्यार्थ्यांचे व गणित विभागचे कौतुक केले. सहभाग्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे ही स्पर्धा उत्तमरीत्या पार पडली. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. केतकी जोशीयांनी केले. सरतेशेवटी स्पर्धा समन्वयक प्रा. स्पृहा जोशी यांनी प्राचार्य, उप प्राचार्य, परीक्षक, गणित विभागप्रमुख व महाविद्यालयाचे आभार मानले.