गोगटे जोगळेकर महाविद्यालयात ‘नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि त्याची अंमलबजावणी’ या विषयावर एकदिवसीय चर्चासत्र नुकतेच संपन्न झाले. मुंबई विद्यापीठाचे माजी प्रा. कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी यांच्या विशेष ऑनलाइन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी केले. त्यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून महाविद्यालयाच्या प्रगतीचा लेखाजोखा मांडला. प्रमुख अतिथींचा परिचय अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई यांनी करुन दिला.
डॉ. रवींद्र कुलकर्णी यांनी नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणाची पार्श्वभूमी, सध्याची शिक्षणपध्दती, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि त्याची अंमलबजावणी, त्याची कार्यपद्धती आणि फलित, शिक्षण क्षेत्रात त्यामुळे होणारे अमुलाग्र बदल अशा विविध पैलूंची सविस्तर माहिती उपस्थातांनी दिली. त्यानंतर या चर्चासत्राकरिता उपस्थितांनी प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून आपल्या शंकांचे निरसन केले.
यावेळी र. ए. सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन ऑनलाइन माध्यमातून तर सचिव श्री. सतीशजी शेवडे, सहकार्यवाह प्रा. श्रीकांत दुदगीकर, प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. मकरंद साखळकर हे मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. विवेक भिडे यांनी तर आभारप्रदर्शन शास्त्र शाखेच्या उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी यांनी केले. या चर्चासत्राकरिता मुंबई विद्यापीठाशी सलग्नित क्लस्टर महाविद्यालयातील प्राचार्य, तिन्ही शाखेचे उपप्राचार्य, विभागप्रमुख आणि प्राध्यापक बहुसंख्येने उपस्थित होते. चर्चासत्राच्या यशस्वी आयोजनासाठी प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांचे मोलाचे मार्गदर्शन तर प्रा. विवेक भिडे, श्री. प्रसाद गवाणकर, सेवक वर्ग यांचे उत्तम सहकार्य लाभले.