गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील भौतिकशास्त्र विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम करणाऱ्या प्रा. निशा नरसिंह केळकर यांची इंडियन अकॅडेमी ऑफ सायन्सेस प्रतिष्ठेच्या शिक्षक संवर्गातील शिष्यावृतीसाठी निवड झाली आहे. कलकत्ता विद्यापीठाच्या प्रोफेसर अनिर्बन कुंडू यांचे मार्गदर्शनाखाली ग्रुप थिअरी या सैद्धांतिक विषयात प्रा.केळकर या काम करीत आहेत. त्यांच्या संशोधनाचा प्रठीक अहवाल अकॅडमीने मान्य केला असून पुढील संशोधान्कार्याही सुरू आहे.
दैनदिन अध्यापनाचे कार्य करीत असणाऱ्या अध्यापकांसाठीहि संशोधन संधी बहुमोल समजली जाते. शैक्षणिक गुणवत्तेवर आधारित निवड केली करून देण्यात येणारी ही शिष्यवृत्ती म्हणूनच महत्वाची समजली जाते. र. ए. सोसायटीचे पदाधिकारी तसेच प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी प्रा. केळकर यांचे अभिनंदन केले आहे.