gogate-college-autonomous-updated-logo

विद्यार्थ्यांनी विविध कला-कौशल्ये आत्मसात सारून राष्ट्र आणि समाजासाठी योगदान द्यावे – शिल्पाताई पटवर्धन गोगटे जोगळेकर महाविद्यालयात पदवीदान समारंभ संपन्न

padvidan

‘विद्यार्थ्यांनी कोणतीही गोष्ट येत नाही असे न म्हणता विविध कला-कौशल्ये आत्मसात करून टी समाजातील इतर घटकांपर्यंत पोहोचवावी तसेच राष्ट्र आणि समाजबंधणीसाठी हातभार लावावा असे आवाहन रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन यांनी विद्यार्थ्यांना केले. गोगटे जोगळेकर महाविद्यालयात ‘पदवीदान समारंभ’ प्रसंगी त्या बोलत होत्या.

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचा पदवीदान समारंभ नुकताच डॉ. ज. शं. केळकर हॉल येथे संपन्न झाला. मुंबई विद्यापीठाच्या मार्च २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षांमध्ये कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेच्या पदवी आणि पदव्युत्तर विभागातील महाविद्यालयामध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरुपात मान्यवरांच्या हस्ते पदवी प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाचा प्रारंभ मुंबई विद्यापीठ गीताने झाला. याप्रसंगी व्यासपीठावर रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन, गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर उपस्थित होते.

कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ‘बालवर्गातून ते पदवीपर्यंत आपण कार्य शिकलो? याचा विकार प्रेत्येक विद्यार्थ्याने करणे आवश्यक असून औपचारिक शिक्षणाबरोबरच सामाजिक जीवन जगताना लागणारे व्यावहारिक शिक्षण घेणे गरजेचे आहे. जेव्हा तुम्ही स्वत:शी स्पर्धा कराल तेव्हा तुमच्या हातून एखादी गोष्ट सर्वोत्तम होऊन खूप मोठे व्हाल, आपल्याला घडविण्यात आपले पालक, शिक्षक, समाज आणि राष्ट्र यांचा मोलाचा वाटा असतो, तेव्हा प्रत्येक विद्यार्थ्याने समाजाप्रती आदर बाळगून समाज राष्ट्रकार्याकरिता कार्य करावे, असे आवाहन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी केले. त्यांनी महाविद्यालयाच्या स्थापनेपासून आजपर्यंतच्या प्रगतीचा लिखाजोखा मांडला. रत्नागिरीतील गोगटे जोगळेकर महाविद्यालय आज कोकणातील नव्हे तर देशातील एक उच्च गुणवत्ताक्षम महाविद्यालय असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालय नेहमीच प्रयत्नशील राहते, असे सांगून विद्यार्थ्यांनी समाजाप्रती आदर बाळगून उत्तम कार्य करावे, असे सांगून विद्यार्थ्यांना भावी वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमाला कला शाखेच्या उपप्राचार्या डॉ. कल्पना आठल्ये, विज्ञान शाखेचे उपप्राचार्य विवेक भिडे, वाणिज्य शाखेचे उपप्राचार्या डॉ. यास्मिन आवटे, विविध विषयांचे विभाग प्रमुख, प्राध्यापक आणि माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन डॉ. निधी पटवर्धन यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी समारंभ समितीने विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये श्री. प्रसाद गवाणकर आणि कार्यालयीन कर्मचारी यांचे मोलाचे योगदान लाभले.

padvidan
padvidan
Comments are closed.