गोगटे जोगळेकर महाविद्यालयात लोकमान्य टिळक पदव्युत्तर विज्ञान विभागाच्या एम.एस्सी.; भाग-१ वर्गातील विद्यार्थ्यांचे स्वागत आणि प्राचार्यांचे मार्गदर्शन हा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पदव्युत्तर विज्ञान विभागाचे समन्वयक डॉ. प्रफुल्ल कुलकर्णी यांनी केले. त्यांनी महाविद्यालयाचा इतिहास, विस्तार व नाविन्यपूर्ण संधी आणि भविष्यातील आव्हाने याविषयी पॉवरपॉइंट सादरीकरण केले.
गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबरच अभ्यासेतर उपक्रमांमध्ये सहभाग तसेच संशोधन क्षेत्रातील संधी, व्यक्तिमत्व विकास, कौशल्यपूर्ण शिक्षण तसेच अध्ययावत माहिती आवश्यक असण्यावर आपल्या मनोगतात विशेष भर दिला. विद्यार्थ्यांचे स्वागत करतानाच विद्यापीठ पातळीवरील उत्तुंग यशाची स्वप्ने पहावित असा मंत्र दिला.
याप्रसंगी विज्ञान विभागाचे उपप्राचार्य डॉ. मिलिंद गोरे, गणित विभाग प्रमुख डॉ. राजीव सप्रे, प्राध्यापक वर्ग आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मेघना म्हादे यांनी तर आभारप्रदर्शन प्रा. निशा केळकर यांनी केले.