gogate-college-autonomous-updated-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात गाव तेथे मानसोपचार उपक्रमांतर्गत व्याख्यान संपन्न

gav-tethe-manspochar-upkram

र. ए. सोसायटीच्या गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात‘गाव तेथे मानसोपचार’ उपक्रमांतर्गत रत्नागिरीतील सुप्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ डॉ. कृष्णा पेवेकर यांचेविशेष व्याख्यान नुकतेच संपन्न झाले.

समाजात अनेक व्यक्ती आजविविध ताणतणावाखाली जीवन जगताना दिसतात. तसेच सामाजिक जीवनात किशोरवयीन मुलांपासूनच व्यसनाधीनता दिसून येते. समाजात मानसिक आरोग्याविषयी जनजागृती व्हावी या हेतूने मानसिक आरोग्य जागृती या मानसोपचार तज्ञांच्या राज्यव्यापी मोहिमेअंतर्गत गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील मानसशास्त्र विभागाच्यावतीने रत्नागिरीतील प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ डॉ. कृष्णा पेवेकर यांच्या ‘व्यसनमुक्ती’ या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. पेवेकर यांनी विद्यार्थांना विविध प्रकारची व्यसने, कौटुंबिक वातावरण, समवयस्कांचा प्रभाव, सामाजिक स्थिती, जैविक कारणे अशा अनेकविध कारणामुळे व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढणे आणि त्याचे दुष्परिणाम इ. ची माहिती दिली. तसेच व्यसनाधीन व्यक्तींमध्ये दिसून येणार्‍या वर्तन समस्या आणि त्यातून त्यांना कसेबाहेर काढावे? याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक कला शाखा उपप्राचार्या डॉ. चित्रा गोस्वामी यांनी केले. मानसशास्त्र विभागप्रमुख प्रा. बीना कळंबटे यांनी प्रमुख व्याख्यातांचा परिचय करून दिला. या कार्यक्रमाला प्रथम, द्वितीयआणि तृतीय वर्ष मानसशास्त्र विभागाचे तसेच प्रथम वर्ष कला शाखेचे विद्यार्थी उपस्थित होते. प्रा. बीना कळंबटे यांनी आभारप्रदर्शन केले. उपस्थितांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे हा कार्यक्रम उत्तमरीत्या पार पडला.

Comments are closed.