महाराष्ट्र शासनाने निर्देशित केल्यानुसार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रमाचे औचित्य साधून गोगटे जोगळेकर महाविद्यालयात ‘संविधान जागर- संविधान जनजागृतीसाठी’ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी महाविद्यालयीन विद्यार्थी आणि उपस्थितांकडून भारतीय संविधानाच्या उद्देशपत्रिकेचे शपथ स्वरुपात वाचन करून घेण्यात आले.
याप्रसंगी कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या विशाखा सकपाळ, पर्यवेक्षक प्रा. अनिल उरुणकर, ग्रंथपाल श्री. किरण धांडोरे, प्रा. डी. एस. कांबळे, प्रा. अरुण यादव, प्रा. वैभव कानिटकर, प्रा. दिलीप सरदेसाई, प्रा. चिंतामणी दामले इ. शिक्षकवृंद व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभारप्रदर्शन ज्येष्ठ प्राध्यापक हिंदी विभागप्रमुख डॉ. शाहू मधाळे यांनी केले.








Visitors Online : 0