gogate-college-autonomous-updated-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात आपले प्रश्न आपले विज्ञान अंतर्गत कार्यशाळा संपन्न

गोगटे जोगळेकर महाविद्यालय आणि आय.आय.टी., मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने समाजाचे प्रश्न मांडण्यासाठी प्राध्यापकांची कार्यशाळा नुकतीच संपन्न झाली. ‘केस स्टडीज’चा वापर कशा पद्धतीने करता येईल; यासंदर्भात प्राध्यापकांची कार्यशाळा घेण्यात आली. याप्रसंगी आय.आय.टी. सिताराचे विभागप्रमुख डॉ. मिलिंद सोहनी, डॉ. प्रिया जाधव, गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी तसेच विज्ञान विभागाच्या उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी हे मान्यवर उपस्थित होते.

उन्नत महाराष्ट्र अभियान या शासनाच्या महत्वाच्या उपक्रमामध्ये आय.आय.टी.चे प्रौद्योगिक विकल्प केंद्र (सितारा) ‘आपले प्रश्न आपले विज्ञान’ या सदराखाली कार्य करत आहे. आपल्या अवती भवती असणाऱ्या समाजाचे प्रश्न महाविद्याललयीन विद्यार्थ्यांना कळावे, त्यांचे अनुभव विश्व वाढावे या दृष्टीने मुंबई विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात असणारा ‘केस स्टडीज’चा वापर कशापध्दतीने करता येईल यासबंधी डॉ. मिलिन सोहनी यांनी विस्तृत मार्गदर्शन केले.

सदर कार्यशाळेमध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध महाविद्यालयाचे सुमारे ४० प्राध्यापक सहभागी झाले. या कार्यशाळेदरम्यान प्रत्येक महाविद्यालयाने काही निवडक केस स्टडीजचे सादरीकरण केले. डॉ. प्रिया जाधव यांनी प्रत्येक महाविद्यालयाने घेतलेले प्रश्न आणि त्याचे शास्त्रशुद्ध सर्वेक्षण कशापद्धतीने करावे याविषयी मार्गदर्शन केले.

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या विज्ञान मंडळातर्फे या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सोनाली कदम यांनी तर आभारप्रदर्शन विज्ञान मंडळाच्या समन्वयक डॉ. वर्षा घड्याळे यांनी केले. या कार्यक्रमाला प्राध्यापक आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

Comments are closed.