गोगटे जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी व मराठी समाजशास्त्र परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय अधिवेशनात गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील ०७ विद्यार्थिनींनी शोधनिबंध सादरीकरण केले. त्यांचे ०५ संशोधन निबंध मान्यताप्राप्त संशोधन पत्रिकेत प्रकाशनासाठी निवडले गेले आहेत. याच अधिवेशनात ०८ प्राध्यापकांनी आपले शोध निबंध सादर केले.
महाविद्यालयातील तृतीय वर्ष समाजशास्त्र विभागातील कु. स्वरांगी भागवत, कु. प्रतिक्षा रानडे, कु. मानसी मोहिते, कु. रिद्धी मुळये, कु. सेजल पेजे, कु. प्रिया हळदणकर व एम. ए. समाजशास्त्र प्रथम वर्षातील सौ. अन्वी साळवी यांनी महिलांचे पुनरुत्पादन आरोग्य, एस.टी. कामगारांचे प्रश्न, कोरोनाकाळातील विद्यार्थांची मानसिकता, आदिवासींचे प्रश्न याविषयांच्या अनुषंगाने आपले संशोधन निबंध सादर केले.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपलब्ध असणारी महाविद्यालयातील संशोधन संसाधने, संशोधन विषयक कार्यशाळा,शोधवेध व अविष्कार सारख्या संशोधन स्पर्धा व विद्यार्थांना संशोधनाची रुची निर्माण करण्याच्या प्राध्यापक मार्गदर्शकांच्या परिश्रमांचे हे फलित आहे असे मनोगत प्र. प्राचार्य डॉ. प्रफुल्लदत्त कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
राष्ट्रीय अधिवेशनातील सहभाग आणि संशोधन पत्रिकेसाठी शोध निबंधांची निवड होण्यासाठी समाजशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. तुळशीदास रोकडे यांनी प्रोत्साहन दिले. डॉ. आनंद आंबेकर, प्रा. शिवाजी उकरंडे, प्रा. सचिन सनगरे यांनी संशोधन निबंधासाठी मार्गदर्शन केले. अधिवेशनात महाराष्ट्रातील वेगवेगळ्या विद्यापीठातील प्राध्यापक, संशोधक विद्यार्थ्यांच्यासोबत चर्चा करण्याची संधी मिळाली. समाजशास्त्र विषयातील अनेक लेखकांना प्रत्यक्ष भेटता आले, अधिवेशनातील विविध अभ्यासपूर्ण परिसंवादांचे श्रवण करता आले. या संधीबद्दल विद्यार्थांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रफुल्लदत्त कुलकर्णी, कलाशाखा उपप्राचार्य डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई, विभाग प्रमुख प्रा. तुळशीदास रोकडे यांनी अभिनंदन केले आहे.