gogate-college-autonomous-updated-logo

मुंबई विद्यापीठ तृतीय वर्ष परीक्षा रिपिटर विद्यार्थी परीक्षा फॉर्म भरण्याचा २१ फेब्रुवारी अखेरचा दिवस

मुंबई विद्यापीठाचे रिपिटर परीक्षार्थी विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की, रिपिटर विद्यार्थी परीक्षा फॉर्म स्विकारण्याची दि. २१ फेब्रुवारी २०२२ ही अखेरची तारीख असून या दिवशी दुपारी २.०० पर्यंत परीक्षा फॉर्म स्वीकारले जाणार आहेत. एप्रिल-मे २०२२ मध्ये होणाऱ्या तृतीय वर्ष रिपिटर विद्यार्थी परीक्षा यामध्ये तृतीयवर्ष विज्ञान, संगणकशास्त्र, आय.टी., जैवतंत्रज्ञान; तृतीयवर्ष वाणिज्य, अकौंटिंग फायनान्स, बी.एम.एस. तसेच तृतीयवर्ष कला; सेमिस्टर पाच आणि सहा (पॅटर्न-रिव्हाईज/१६/७५_२५) करिता परीक्षा शुल्क एका विषयासाठी रु. २१६; दोन विषयांसाठी रु. ३८१ तर तीन किंवा जास्त विषयांसाठी रु. ७९४ असे राहील; (मुंबई विद्यापीठ परिपत्रक क्र.: परीक्षा/परीक्षा अर्ज/निकाल कक्ष/३४८/२०२२; दि. ३.२.२०२२ अन्वये) तरी सबंधित विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी.

विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी केले आहे.

Comments are closed.