gogate-college-autonomous-updated-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात उर्दू राष्ट्रीय चर्चासत्र संपन्न

gjc-urdu-conference-news

र. ए. सोसायटीच्या गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील उर्दू विभाग आणि राष्ट्रीय उर्दू भाषा विकास परिषद, भारत सरकार, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने ‘साहीर शेवी: एक ह्श्त पहेलू फनकार’ (Sahir Shiwee: A Multidimensional Writer) या विषयावरील एकदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र महाविद्यालयात नुकतेच संपन्न झाले.

गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील उर्दू विभाग, उर्दू भाषेच्या प्रचार आणि प्रसारासाठी कायम प्रयत्नशील असतो. उर्दूच्या विकासासाठी विभागाच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येतात. या आधीही विभागाच्या वतीने विविध राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय चर्चासत्र-परिषदांचे आयोजन करण्यात आले आहे. उर्दू विभाग आणि राष्ट्रीय उर्दू भाषा विकास परिषद, भारत सरकार, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार, दि. ३० मार्च, २०२२ रोजी ‘साहीर शेवी: एक ह्श्त पहेलू फनकार’ (Sahir Shiwee: A Multidimensional Writer)या विषयावरील एकदिवसीय राष्ट्रीयचर्चासत्राचे आयोजन महाविद्यालयाच्या राधाबाई शेट्ये सभागृहात करण्यात आले होते. या चर्चासत्राचेउद्घाटन सकाळी ११.१० मिनिटांनी र. ए. सोसायटीचे सचिव श्री. सतीश शेवडे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाची सुरुवात स्वागतगीत आणि दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी द्वितीय वर्ष कला शाखेच्या विद्यार्थिनी धनश्री पांचाळ आणि सुकन्या शहाणे यांनी स्वागतगीत सादर केले. निरंजन तेंडूलकर आणि रोहित सागवेकर यांनी त्यांना अनुक्रमे तबला आणि ढोलकीचीसाथ दिली. यावेळी दानिश मस्तान या विद्यार्थाने कुराणातील काही पवित्र वचने सादर केली.

कार्यक्रमाच्या प्रारंभीमहाविद्यालयाच्या वतीने मान्यवरांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर महाविद्यालयातील हिंदी विभागप्रमुख डॉ. शाहू मधाळे यांचा जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळ, नागपूर या संस्थेचा ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार’ मिळाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

त्यानंतर डॉ. मोहम्मद दानिश गनी यांनी चर्चासत्राचा विषय, ते आयोजित करण्यामागील पार्श्वभूमी, हेतू या विषयी सविस्तर माहिती दिली.

कार्यक्रमाच्या स्वागतपर मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी म्हणाले, रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी, गोगटे जोगळेकर महाविद्यालय हे कोकणातील एक नामवंत, प्रतिष्ठितमहाविद्यालय असून, मुंबई विद्यापीठातील पहिल्या दहा महविद्यालयात महाविद्यालयाची गणना होते. राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रमाणन परिषद (NAAC) कडून करण्यात आलेल्या मूल्यांकनात महाविद्यालयाने सातत्याने चार वेळा ‘अ’ श्रेणी प्राप्त केली असून, मुंबई विद्यापीठाचे ‘बेस्ट कॉलेज अवार्ड’ महाविद्यालयाला मिळाले आहे. भारत सरकार आणि विद्यापीठ अनुदान आयोगाकडून मिळालेल्या विविध अनुदानांचालाभ महाविद्यालयघेत आहे. संस्था-महाविद्यालयाच्या प्रगतीचा लेखाजोगा मांडून त्यांनी महाविद्यालयात सुरु असलेल्या विविध शैक्षणिक-सह शैक्षणिक उपक्रम, संशोधन याविषयीची माहितीउपस्थितांना दिली. उर्दू भाषेच्या प्रचार-प्रसारासाठीगेल्या आठ वर्षात प्रा. दानिश गनी सातत्याने प्रयत्नशील असून, अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन त्यांनी केले आहे. या परिसंवादाच्या निमित्ताने राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामवंत व्यक्ती महाविद्यालयाला भेट देत आहे हे महाविद्यालय आणि आमच्यासाठी भाग्याचे क्षण असल्याचे सांगून. प्रा. डॉ. गनी यांनी कोकण परिसरात उर्दूच्या प्रचार-प्रसारासाठी केलेल्या कामाचे त्यांनी कौतुक केले.

चर्चासत्राचे बीजभाषक डॉ. नूर-उल-अमीन (उर्दू विभागप्रमुख, शारदा महाविद्यालय, परभणी) यांनी आपल्या मनोगतातूनउर्दू भाषेतील सुप्रसिद्ध लेखक साहीर शेवी यांच्या साहित्यातील विविध पैलू उपस्थितांना उलगडून दाखवले. कोकण प्रांताशी साहीर शेवी यांचा खूप जवळचा संबंध आहे. उर्दू साहित्यात त्यांनी आपल्या लेखनाने मोलाची भर घातली आहे, असे उद्गार त्यांनी काढले.

प्रमुख अतिथी डॉ. अब्दुल्ला इम्तियाझ अहमद (विभागप्रमुख, उर्दू विभाग, मुंबई विद्यापीठ, मुंबई)यांनी डॉ. अब्दुल रहीम नश्तर यांचे बालसाहित्य निर्मितीत मोलाचे योगदान आहे. साहीर शेवी यांच्यावरील राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन केल्याबद्दल संस्था, महाविद्यालयाचे कौतुक केले. महाविद्यालयातील उर्दू विभागाने गेल्या काही वर्षात उर्दू भाषेच्या प्रचार आणि प्रसारासाठी विविध चर्चासत्र, परिषदा आदि उपक्रमांच्या माध्यमातून केलेले प्रयत्न निश्चितच उल्लेखनीय असल्याचे त्यांनी पुढे सांगितले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षीय मनोगतात रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे सचिव श्री. सतीश शेवडे यांनी संस्कृत आणि उर्दू हे महाविद्यालयातील जुने शैक्षणिक विभाग असून, संस्कृत आणि उर्दू भाषेच्या प्रचार-प्रसारासाठी दोन्ही विभाग सक्षमपणे सतत कार्यरत असतात. उर्दू विभागाचे हे राष्ट्रीय चर्चासत्र कोकणातील आमच्या महाविद्यालयात संपन्न होणे ही रत्नागिरी शिक्षण संस्थेसाठी आनंदाची गोष्ट असून, भविष्यात संस्कृत बरोबर उर्दू भाषेच्या प्रचार-प्रसारासाठीदेखील संस्था पूर्णपणे सहकार्य करेल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी उपस्थित मान्यवरांना दिली. याप्रसंगी प्रा. डॉ. मोहम्मद दानिश गनी यांच्या ‘अब्दुल रहीम नश्तर की शेरी खिदमात : हिंद – व – पाक मशाहीर की नजर मे’ या पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विभागाची माजी विद्यार्थिनी आणि मिस्त्री हायस्कूल, रत्नागिरी येथील सहाय्यक शिक्षिका शाजिया समीर बुड्ये यांनी तर आभारप्रदर्शन हिंदी विभागप्रमुख प्रा. डॉ. शाहू मधाळे यांनी केले.

या उद्घाटन सोहळ्यानंतर डॉ. अब्दुल्ला इम्तियाझ अहमद, डॉ. नूर-उल-अमीन, श्री. निजामुद्दीन साद यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सत्रांमध्ये देशभरातून आलेल्या विविध उर्दू भाषेच्या संशोधक, अभ्यासकांनी आपापल्या शोधनिबंधाचे वाचन करून साहीर शेवी यांच्या साहित्यावर विविध अंगानी प्रकाश टाकला..
या राष्ट्रीय चर्चासत्रात जहीर दानिश उमरी, (हैदराबाद) श्री. अब्दुल रऊफ खतिब (खेड) डॉ. गझन्फर इक्बाल (गुलबर्गा), डॉ. इर्शाद अहमद खान (नांदेड) डॉ. ताबिश खान (अरेबिक विभाग, मुंबई विद्यापीठ, मुंबई), डॉ. असरार उल्लाह अन्सारी (बुऱ्हानपूर), श्रीमती सय्यदा तबस्सुम नाडकर (मुंबई), श्री. कमाल मांडलेकर (मुंबई), डॉ. अबरार अहमद (पुणे), डॉ. शेख अहरार अहमद (मुंबई), डॉ. जावेद राणा (जबलपूर), डॉ. सय्यद ताजुल हुदा खतिब (बेलगावी), श्री. निजामुद्दीन साद (महाड), श्री. सईद कवल (मुंबई), श्री. मन्जर खय्यामी (श्रीवर्धन), डॉ. मोहसीन फराश(गुलबर्गा) आदि मान्यवर संशोधक उपस्थित होते.

या चर्चासत्राचा समारोप गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. प्रफुल्लदत्त कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली सायंकाळी ५.०० वाजता पार पडला.हे चर्चासत्र गोगटे – जोगळेकर महाविद्यालयात संपन्नझाले असल्याने हा क्षण संस्था, महाविद्यालयाच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल, असे चर्चासत्र आमच्या महाविद्यालयात होणे हा आमच्यासाठी भाग्याचा क्षण असल्याचे असे मत प्रभारी प्राचार्य डॉ. प्रफुल्लदत्त कुलकर्णी यांनी व्यक्त केले.या राष्ट्रीय चर्चासत्रातमान्यवर व्यक्तींनी सादर केलेल्या उर्दू-हिंदी भाषेतील शेरो-शायरीमुळे चर्चासत्राचे वातावरण एकदम फुलून निघाले. उपस्थितांनी वेळोवेळी त्याला दाद दिली.

या राष्ट्रीय चर्चासत्राच्या यशस्वी आयोजनाकरिता र. ए. सोसायटीच्या कार्याध्यक्षा शिल्पाताई पटवर्धन, सचिव श्री. सतीश शेवडे, गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांचे मार्गदर्शन तर प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, तिन्ही शाखांचे उपप्राचार्य, उर्दू विभागप्रमुख डॉ. मोहम्मद दानिश गनी, प्रबंधक श्री. रवींद्र केतकर, श्री. प्रसाद गवाणकर, श्री. कुमार काकतकर, विविध विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, सेवक वर्ग, उर्दू विभागाचे विद्यार्थी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या चर्चासत्राला उर्दूचे जाणकार आणि रसिक यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती लाभली. महाराष्ट्र शासन, मुंबई विद्यापीठ यांच्या कोरोनाविषयक नियमांचे पालन करून या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले.

Comments are closed.