पटवर्धन हायस्कूल, रत्नागिरी येथे दि. १८ सप्टेंबर २०२२ रोजी जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली. गुरुवर्य अच्युतराव पटवर्धन स्मृती ‘वक्ता दशसहस्रेषु २०२२’ वक्तृत्व स्पर्धेमध्ये एकंदर चार गट होते. यामध्ये वरिष्ठ महाविद्यालयीन गटात मनस्वी नाटेकर आणि सिद्धी सार्दळ या विद्यार्थिनींनी सहभाग घेतला.
प्रथम वर्ष कला शाखेत शिकणाऱ्या मनस्वीने ‘परीक्षा अशी हवी’ हा विषय मांडला व तृतीय क्रमांक प्राप्त केला तर द्वितीय वर्ष कला शाखेत शिकणाऱ्या सिद्धीने ‘वाढती प्रसारमाध्यमे आणि मी’ या विषयावर बोलून उत्तेजनार्थ क्रमांक प्राप्त केला. वक्तृत्व व वादविवाद समितीचे समन्वयक प्रा. जयंत अभ्यंकर यांनी या विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.
या उल्लेखनीय यशाबद्दल महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी सर यांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धांसाठी या विद्यार्थिनींना शुभेच्छा दिल्या व अनेक विद्यार्थ्यांनी अशा स्पर्धेत अवश्य सहभाग घेऊन अभ्यासाबरोबर आपला व्यक्तिमत्त्व विकास साधावा असे आवाहनही केले.