गोगटे जोगळेकर महाविद्यालयामध्ये प्रथम वर्ष विज्ञान वर्गातील कु. विनिता वालावलकर हिची होमी भाभा विज्ञान संशोधन केंद्र, मुंबई मार्फत आयोजित केल्या जाणाऱ्या उन्हाळी शिबिराकरिता निवड झाली आहे. या अंतर्गत तिला होमी भाभा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशन, मुंबई येथे दोन आठवडे भौतकशास्त्रातील मुलभूत संशोधनाचे काम करण्याची संधी मिळणार आहे.
या निवडीबद्दल भौतकशास्त्र विभागातील डॉ. महेश बेळेकर आणि गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी तिचे अभिनंदन केले आहे.