gogate-college-autonomous-updated-logo

गोगटे जोगळेकर महाविद्यालयात ‘बौद्धिक संपदा’ या विषयावरील वेबीनार संपन्न

गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या इंटरनल क्वालिटी अॅशुरंन्स सेल आणि करिअर गायडन्स अॅड प्लेसमेंट सेलच्या संयुक्तविद्यमाने आणि पेटंट ऑफीस, मुंबई यांच्या सहकार्याने ‘इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी अवेअरनेस प्रोग्राम’ या कार्यक्रमांतर्गत नुकतेच एका वेबीनारचे आयोजन करण्यात आले होते. भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने देशभरात विविध कार्यक्रम घेतले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी इंडिया, वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय, भारत सरकारमार्फत बौद्धिक संपदेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी देशभर विविध शैक्षणिक संस्था, महाविद्यालये आणि विद्यापीठांममधील विद्यार्थ्यांकरिता अवेअरनेस प्रोग्राम घेतले जात आहेत.

गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील कला, वाणिज्य आणि शास्त्र या शाखांमधील सुमारे ३०० विद्यार्थ्यांनी सदर कार्यक्रमाला ऑनलाइन सहभाग नोंदविला. वेबीनारच्या साधन व्यक्ती श्री. उज्ज्वल सिंग यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. रत्नागिरीतील प्रथितयश अशा गोगटे जोगळेकर महाविद्यालयातर्फे आयोजित ‘बौद्धिक संपदा’ या विषयावर आयोजित वेबीनारमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी ‘बौद्धिक संपदा क्षेत्रात विपुल संधी उपलब्ध असल्याचे’ नमूद केले. त्यांनी विविध प्रकारच्या बौद्धिक संपदा, त्यांचे स्वरूप, प्रकार, सबंधित कायदे, नोंदणीची प्रक्रिया, कायदेशीर संरक्षण इ. बाबत विविध उदाहरणासह सविस्तर माहिती दिली. बेबिनारच्या शेवटी घेतलेल्या प्रश्नमंजुषेला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

या वेबीनारचे यशस्वी आयोजन कार्यक्रमाचे निमंत्रक गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी, कला विभागाचे उपप्राचार्य डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई यांचे मार्गदर्शनाखाली समन्वयक डॉ. रुपेश सावंत यांनी केले.

Comments are closed.