गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी दि. २२ सप्टेंबर २०१७ रोजी सातारा जिल्ह्यातील, युनेस्कोने घोषित केलेले जागतिक वारसा स्थळ असलेल्या कास पठाराला भेट दिली.
प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्ष विज्ञान शाखेत वनस्पतीशास्त्र विषय शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी या क्षेत्रभेटीतील निरीक्षण सहलीत सहभाग घेतला. युट्रीक्युलारीया, डीपं कँडी, तुतारी, ड्रोसेरा, सोनकी, मंजिरी, टोपली कारवी, जांसनेल्ला, उंदरी, बोगोनिया, तेरडा, गुलाबी तेरडा, स्ट्रायगा, जांभळा तेरडा , गोधडी, कनस्कोरा, अॅलीसिकार्पास इत्यादी प्रदेशनिष्ठ वनस्पतींचे निरीक्षण या क्षेत्रभेटीदरम्यान केले. वनस्पतीशात्र विभागाचे प्रा. शरद आपटे यांनी विविध वनस्पती प्रजातींसंदर्भात विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले. प्रा. डॉ. सोनाली कदम आणि प्रा. स्नेहल रसाळ यांनी देखील या निरीक्षण सहलीत सहभाग घेतला.