राजीव गांधी विज्ञान तंत्रज्ञान आयोगाच्या सहकार्याने, मराठी विज्ञान परिषद, मुंबई आणि गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचा गणित विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 28 आणि 29 मार्च 2018 रोजी अकरावी आणि बारावी मधील विद्यार्थ्यांकरिता दोन दिवसीय गणित कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी मराठी विज्ञान परिषदेचे समन्वयक डॉ. प्रफुल्ल कुलकर्णी उपस्थित होते.
सदर कार्यशाळेला महाविद्यालयातील गणित विभाग प्रमुख डॉ. राजीव सप्रे हे व्याख्याते म्हणून लाभले होते. दोन दिवस चालेल्या या कार्यशाळेत JEE CET या परीक्षांना सामोरे जाताना तयारी कशी आणि काय करावी याचे सोप्या आणि रंजक पद्धतीने डॉ. सप्रे यांनी विद्यार्थायंना मार्गदर्शन केले. रत्नागिरी परिसरातील अकरावी आणि बारावीतील विद्यार्थ्यांनी सदर कार्यशाळेचा लाभ घेतला. महाविद्यालायचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी ही कार्यशाळा यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल आयोजकांचे आणि सहभागी व्यक्तींचे कौतुक केले.