महाराष्ट्र राज्य ज्यूनियर महिला पॉवरलिफ्टिंग स्पर्धा नुकत्याच महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग असोसिएशन आणि महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, एल्फिन्स्टन, मुंबई येथे संपन्न झाल्या. या स्पर्धेत गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या मुलींच्या संघाने एक सुवर्ण, एक रौप्य आणि एक कांस्य पदकाची कमाई करत दैदिप्यमान कामगिरी केली आहे. तेजस्विनी सावंत (७२ कि. सुवर्णपदक), नेहा नेने (६३ कि. रौप्य पदक), आदिती शिर्के (५७ कि. कांस्य पदक), लावण्या समसानी (८४ कि. कांस्य पदक), रक्षंदा पाटील (+८४ कांस्य पदक) यांनी या स्पर्धेत सुयश प्राप्त केले आहे.
या स्पर्धेत गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या विद्यार्थीनी रत्नागिरी जिल्हा महिला पॉवरलिफ्टिंग असोसिएशनच्या संघातून महाराष्ट्र राज्य ज्यूनियर महिला पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या. या स्पर्धेत रत्नागिरी जिल्हा महिला पॉवरलिफ्टिंग असोसिएशनच्या संघाला सांघिक उपविजेतेपद प्राप्त झाले होते.
महाविद्यालयाच्या खो-खो संघाला क्रीडा संचालक डॉ. विनोद शिंदे यांचे मार्गदर्शन आणि प्रा. ओंकार बाणे, श्री. कमलेश लाड, श्री. वैभव हंजनकर आणि योगिता बनप तसेच रत्नागिरी जिल्हा पॉवरलिफ्टिंग असोसिएशनचे सेक्रेटरी श्री. मदन भास्करे यांचे सहकार्य लाभले.
या उज्ज्वल यशाबद्दल संस्थेच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन, कार्यवाह श्री. सतीश शेवडे, जिमखाना समितीचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर केळकर आणि सर्व सदस्य तसेच गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, तीनही विभागाचे उपप्राचार्य, प्राध्यापक आणि कर्मचारी व सेवक वर्ग यांनी विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन करून पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या.