गोगटे जोगळेकर आणि अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयातर्फे स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ, पावस पुरस्कृत आंतरराज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दि. १५ डिसेंबर २०१७ या दिवशी महाविद्यालयाच्या राधाबाई शेट्ये सभागृहात ही स्पर्धा होणार आहे. ही स्पर्धा महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि मध्यप्रदेश या राज्यांसाठी आहे. या स्पर्धेकरिता प्रत्येक महाविद्यालयातून दोन स्पर्धकांचा गट सहभागी होऊ शकतो. प्रवेश शुल्क रू. २५ प्रती स्पर्धक आहे.
स्पर्धेचे विषय, गट आणि वेळ आणि पुढीलप्रमाणे-
कनिष्ठ गट; वेळ ८ मिनिटे
1) नित्य घडो मज संगती जेणे होय मति सुनिर्मळ (पत्र मंजुषा २९-२)
2) सोशल मीडियाची विश्वासार्हता
3) श्यामची आई ते आजची आई
बक्षिसांची रक्कम रू. २०००, १५००, १०००, उत्तेजनार्थ ५००ची दोन बक्षिसे.
वरिष्ठगट; वेळ १० मिनिटे
1) सर्वथा संयमी जीवन तयासी नाव धर्माचरण (पत्र मंजुषा ५-४)
2) भारताची विश्वमैत्री
3) कर भ(र)ला तो हो भला
बक्षिसांची रक्कम रू. ३०००, २०००, १५००, उत्तेजनार्थ १०००ची दोन बक्षिसे.
या स्पर्धेकरिता स्पर्धा संयोजक प्रा. मकरंद दामले ९४२११४३३४३ यांच्याशी संपर्क साधून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी केले आहे.