मुंबई विद्यापीठाच्या मार्च २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षांमध्ये गोगटे जोगळेकर महाविद्यालयातून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या पदवीदान समारंभाचे आयोजन गुरुवार दि. २७ एप्रिल २०२३ रोजी करण्यात आले आहे. सदर समारंभ सायंकाळी ४.०० वाजता गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या डॉ. ज. शं. केळकर सेमिनार हॉल येथे संपन्न होणार आहे.
सदर पदवीदान समारंभात पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरुपात विद्यापीठाची पदवी मान्यवरांच्या हस्ते समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार असून विद्यार्थ्यांनी या समारंभासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी यांनी केले आहे.






Visitors Online : 1